नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : पेटीएम (paytm) वॉलेटचा वापर किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, पाणी आणि विजेचं बिल भरण्यासाठी, गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा पेटीएम वॉलेटमधून पेमेंट स्वीकारल्या जाणाऱ्या ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी वापर केला जातो. मात्र, पेटीएम वॉलेटमधून अनेक ठिकाणी पेमेंट स्वीकारले जात नाही. अशा ठिकाणी इतर पेमेंट पर्याय वापरावे लागतात. पण लवकरच पेटीएमचा वापर आणखी मोठ्या प्रमाणावर केला जाईल. आता पेटीएमनं प्रीपेड रुपे कार्ड पेटीएम वॉलेट कार्ड (paytm launches paytm wallet card ) लाँच केलं आहे. हे कार्ड RuPay कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व व्यापारी आणि दुकानांवर वापरले जाऊ शकते. पेटीएम वॉलेट कार्ड हे प्रीपेड कार्ड आहे. हे तुमच्या पेटीएम वॉलेट बॅलन्सशी जोडलं जाईल. हे कार्ड रूपे प्लॅटफॉर्मवर सादर करण्यात आलं आहे. सध्या ते व्हर्च्युअल कार्डच्या स्वरूपात दिलं जात आहे. लवकरच, याचं फिजिकल कार्डही लोकांच्या हातात दिलं जाईल. हे एक्सपायरी डेट आणि सीव्हीव्ही क्रमांकासह 16 अंकी क्रमांकासह असेल. या कार्डद्वारे, वॉलेटमध्ये शिल्लक असलेली रक्कम ऑनलाईन आणि ऑफलाइन वापरता येईल. पेटीएमच्या रुपे कार्डद्वारे हे पेमेंट घेतलं जाईल. हे वाचा - Explainer : आखाड्यांची संपत्ती किती? कुठून येतो हा पैसा आणि कुठला आखाडा सर्वाधिक श्रीमंत? पेटीएम वॉलेट कार्ड POS वर स्वाइप करता येईल समजा, पेटीएम वॉलेटमध्ये 500 रुपये शिल्लक आहे आणि तुम्ही ज्या दुकानात स्वाइप मशीन (पीओएस) आहे, तिथं खरेदी करत आहात, तर पेटीएम वॉलेटचा पर्याय अशा ठिकाणी काम करत नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला मिळालेल्या पेटीएम वॉलेट कार्डच्या मदतीनं तुम्ही स्वाइप मशीनद्वारे 500 रुपयांचं पेमेंट करू शकाल. हे वाचा - ITR Alert: उशीरा आयटीआर भरला तर द्यावा लागणार भरभक्कम दंड, या करदात्यांना मिळणार सूट त्याचप्रमाणे, जो ऑनलाईन व्यापारी पेटीएम वॉलेटमधून पेमेंट घेत नाही, त्याला डेबिट/क्रेडिट कार्ड पर्याय निवडावा लागेल. यानंतर पेटीएम वॉलेट कार्डचा 16 अंकी क्रमांक, एक्स्पायरी डेट आणि सीव्हीव्ही टाकून पेमेंट करावे लागेल. पेटीएम वॉलेट कार्ड अॅक्टिव्ह कसे करायचे सर्वप्रथम पेटीएम अॅप उघडा. मुख्यपृष्ठावर, माय पेटीएम विभागात जा आणि पेटीएम वॉलेटवर क्लिक करा. तिथं तुम्हाला तळाशी पेटीएम वॉलेट कार्ड सक्रिय करण्याचा पर्याय मिळेल. सध्या हे कार्ड निवडक वापरकर्त्यांना दिलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.