Gold Price Today: सोने दरात पुन्हा वाढ, तर चांदीही वधारली; जाणून घ्या नवा भाव

Gold Price Today: सोने दरात पुन्हा वाढ, तर चांदीही वधारली; जाणून घ्या नवा भाव

मौल्यवान धातूच्या किंमतीत चढ-उतार सुरूच राहतील, असा अंदाज आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे लोक पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत असून याचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होणार असल्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 एप्रिल : भारतीय बाजारात आज सोने दरात तेजी पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात आज 27 एप्रिल 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 47000 रुपयांहून कमी होता. चांदीचा दरही (Silver Price Today) वधारला. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोनं 46,837 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं. तर चांदी 67,635 रुपये प्रति किलोग्रॅम होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आज गोल्डच्या किंमतीत, भारतीय बाजाराच्या उलट घसरण नोंदवली गेली. तर चांदीचा भाव स्थिर होता.

सोन्याचा आजचा नवा भाव (Gold Price, 27 April 2021) -

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात 69 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली. राजधानी दिल्लीत 99.9 शुद्धतेच्या सोन्याच्या भाव आता 46,906 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात सोनं 46,837 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं.

चांदीचा आजचा दर (Silver Price, 27 April 2021) -

चांदीचा भावही आज वधारला. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा दर 255 रुपयांनी वधारला असून 67,890 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. या आधीच्या सत्रात चांदी 67,635 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

(वाचा - PPF Scheme:रोज 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 15 लाख,जाणून घ्या काय आहे योजना)

सोने दरात तेजी का?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक आणि गुंतवणुदारांना अमेरिकी फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीची प्रतिक्षा आहे. यात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मौल्यवान धातूच्या किंमतीत चढ-उतार सुरूच राहतील, असा अंदाज आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे लोक पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत असून याचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होणार असल्याची शक्यता आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: April 27, 2021, 6:53 PM IST

ताज्या बातम्या