मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घरगुती गॅस कनेक्शनसोबत मिळणार 50 लाखांपर्यंत विमा?

घरगुती गॅस कनेक्शनसोबत मिळणार 50 लाखांपर्यंत विमा?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

जर एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला किंवा गॅस गळतीमुळे अपघात झाला तर ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: सध्याच्या काळात जवळजवळ प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकासाठी एलपीजीचा वापर केला जातो. गॅस वापरताना काळजीपूर्वक वापरावा, अशा सूचना वारंवार मिळत असतात. कारण, सिलिंडरमधील छोटासा बिघाडदेखील मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो.

एलपीजी वापरताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास काय केलं पाहिजे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हेदेखील माहिती पाहिजे की, जर एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला किंवा गॅस गळतीमुळे अपघात झाला तर ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत.

जी व्यक्ती एलपीजी गॅस कनेक्शन घेते तिला 50 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स उतरवला जातो. या पॉलिसीला एलपीजी इन्शुरन्स कव्हर म्हणतात. गॅस सिलिंडरमुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हानीसाठी हे कव्हर दिलं जातं.

जेव्हा एलपीजी सिलिंडर खरेदी केला जातो त्यावेळीच इन्शुरन्स काढला जातो. हा इन्शुरन्स सिलिंडरच्या एक्सपायरी डेटशी जोडलेला असतो. त्यामुळे नेहमी एक्स्पायरी डेट पाहूनच सिलिंडर घेतला पाहिजे.

असा वाचवा तुमचा गॅस... महागाईच्या काळात 'ही' किचन ट्रीक तुमच्या कामाची

गॅस कनेक्शन मिळताच तुम्हाला 40 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेल. यासोबतच सिलिंडरच्या स्फोटामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम करता येऊ शकतो. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणताही अतिरिक्त मासिक प्रीमियम भरावा लागणार नाही.

एलपीजी इन्शुरन्स क्लेम कसा करता येतो

ग्राहकानं अपघात झाल्याच्या 30 दिवसांच्या आत त्याच्या वितरकाकडे आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची तक्रार दिली पाहिजे. गॅस सिलिंडरमुळे अपघात झाल्याची एफआयआरची प्रत पोलिसांकडून घेणं आवश्यक आहे.

इन्शुरन्स क्लेमसाठी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआर प्रतीसोबत वैद्यकीय पावती, रुग्णालयाचं बिल, शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यूचं प्रमाणपत्रही आवश्यक आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर सिलिंडर आहे त्यालाच विम्याची रक्कम मिळते. या पॉलिसीमध्ये तुम्ही कोणालाही नॉमिनी बनवू शकत नाही. ज्यांचं सिलिंडर पाईप, स्टोव्ह आणि रेग्युलेटर आयएसआय मार्कचे आहेत, अशांनाच इन्शुरन्स क्लेम करता येतो.

क्लेमचे पैसे कुठून मिळतात?

जेव्हा तुम्ही तुमच्या वितरकाकडे अपघाताची माहिती देता तेव्हा तो संबंधित तेल कंपनी आणि विमा कंपनीला अपघाताची माहिती देतो. इंडियन ऑइल, एचपीसीएल, बीपीसीएल यासारख्या तेल कंपन्या सिलिंडरमुळे अपघात झाल्यास विम्याचा संपूर्ण खर्च उचलतात.

गॅस डीलरने ग्राहकांच्या गॅस कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल माहिती देणं अपेक्षित असतं. पण, बहुतेक डीलर्स ग्राहकांना कनेक्शन देताना याबाबत माहिती देत नाही. म्हणूनच ग्राहकांनी आपल्या हक्कांबद्दल जागरूक असलं पाहिजे.

First published:

Tags: Gas, LPG Price