मुंबई ११ नोव्हेंबर : एलपीजीच्या किमती इतक्या वाढल्या आहेत. की त्याचा परिणाम गृहिनींच्या बेजेटवर देखील झाला आहेत. ज्यामुळे महिलांचा कल असतो तो गॅस वाचवण्याकडे. यामुळे बऱ्याच महिला या आपल्याला आवडत असलेले जास्तीचे पदार्थ देखील बनवत नाहीत. ज्यामुळे गॅस वाचवता येतो. अनेक महिला तर एका वेळेचंच जेवण बनवतात. ज्यामुळे गॅस वाचवता येतो आसा त्यांचा समज आहे. पण आम्ही तुमच्यासाठी काही अशा टीप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या तुम्हाला गॅस वापरताना फायदा होईल. हे ही वाचा : वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिसमधल्या जिन्याची रचना कशी असावी?
चला या ट्रीक्स जाणून घेऊ या
फ्रीजमधील पदार्थ थेट शिजवू नका अनेक महिलांना ही सवय असते की ते थेट फ्रिजरमधून दूध किंवा भाजी काढतात आणि वस्तू थेट गॅसवर ठेवू नका. किमान 1-2 तास आधी फ्रीजमधून पदार्थ बाहेर काढा. याचा अर्थ असा की, जर जेवण तयार करण्याची घाई नसेल, तर खोलीच्या तापमानावर जेवण नक्कीच करा. कारण यामुळे गॅसचा वापर कमी होईल आणि तुमचे अन्नही सहज शिजले जाईल. नॉन-स्टिक भांडी वापरा गॅस वाचवण्यासाठी तुम्ही नॉन-स्टिक पॅन वापरू शकता. यामुळे गॅस कमी लागतो किंवा जेवण पटकन शिजते. शिवाय यामध्ये तेल देखील कमी लागतं, त्यामुळे तेलाची देखील बचत होते. नॉन-स्टिक पॅनमध्ये स्वयंपाक केल्याने अन्न परिपूर्ण होईल आणि अन्न जळणार नाही. यामुळे तुमचा सिलेंडरही वाचेल. कोरड्या भांड्यात अन्न शिजवा कारण ओल्या भांड्यात अन्न शिजवल्याने गॅसचा वापर जास्त होतो. त्यामुळे तुम्ही काहीही शिजवत असाल तर आधी भांडी कोरडी करा. त्यानंतर अन्न तयार करा. याद्वारे तुम्ही स्वयंपाकाच्या गॅसची बचत करू शकाल.
प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवा स्वयंपाकासाठी प्रेशर कुकर वापरण्याची खात्री करा. मसूर, मांस, चिकन आणि अनेक भाज्या उकळण्यासाठी जास्त गॅस लागतो, त्यामुळे अशा भाज्या किंवा मांस शिजवण्यासाठी नेहमी प्रेशर कुकरचा वापर करा. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल, तर त्यात मांस किंवा चिकन अर्धवट शिजवा. कारण मायक्रोवेव्हमध्ये मांस किंवा चिकन लवकर शिजते.