जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ATMमधून पैसे निघाले नाहीत, मात्र खात्यातून रक्कम कट झालीये? लगेच करा हे काम

ATMमधून पैसे निघाले नाहीत, मात्र खात्यातून रक्कम कट झालीये? लगेच करा हे काम

ATMमधून पैसे निघाले नाहीत, मात्र खात्यातून रक्कम कट झालीये? लगेच करा हे काम

ATMमधून पैसे निघाले नाहीत, मात्र खात्यातून रक्कम कट झालीये? लगेच करा हे काम

कधीकधी एटीएममधून पैसे तर निघत नाहीत, मात्र तुमच्या खात्यातून ते कापले जातात. अशा परिस्थितीत या समस्येची तक्रार कुठं करायची आणि ती कशी सोडवायची हेच समजत नसल्यानं ग्राहक घाबरतात.

  • -MIN READ Atmakur,Mahbubnagar,Telangana
  • Last Updated :

मुंबई, 27 जुलै: पूर्वी बँक खात्यातून पैसे काढायचे झालं तर बँकेत जाऊन रांगेमध्ये उभं राहावं लागायचं. परंतु एटीएममुळं (Automated teller machine) आपलं जीवन सुकर झालं आहे. आपण एटीएममध्ये जाऊन काही मिनिटांतच सहज पैसे काढू शकतो. परंतु काहीवेळा एटीएम आपल्याला अडचणीतही आणतात. अनेक वेळा असं घडतं की, एटीएममधून पैसे काढताना पैसे तर निघत नाहीत, मात्र तुमच्या खात्यातून मात्र ते कापले  (cash not received from ATM but amount deducted) जातात. पैसे कापल्याचा मेसेज येतो पण एटीएममधून पैसे आपल्याला मिळालेले नसतात. अशा परिस्थितीत या समस्येची तक्रार कुठं करायची आणि ती कशी सोडवायची हेच समजत नसल्यानं ग्राहक घाबरतात. आज आम्ही तुम्हाला या समस्येवर सांगणार आहोत. जर अशी परिस्थिती तुमच्या समोर आली तर तुम्हाला काय करावं, चला जाणून घेऊया. 5 दिवसात परत केले जातील पैसे- एटीएममधून पैसे न काढता तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले असतील, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. वास्तविक, काहीवेळा तांत्रिक समस्यांमुळं असं घडतं. हे पैसे परत करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) बँकांसाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, सर्व बँकांना 5 कामकाजाच्या दिवसांच्या आत डेबिट केलेले पैसे जमा करावे लागतील. या नियमाचं उल्लंघन केल्यास दररोज बँकेला 100 रुपये दंड भरण्याचा नियम करण्यात आला आहे. हेही वाचा-  Business Ideas: नोकरी करत असतानाच सुरु करा ‘हा’ खास व्यवसाय, दरमहा कमवा लाखो रुपये या गोष्टी लक्षात ठेवा-

  • रोख पैसे काढण्याच्या वेळी, एटीएममध्ये व्यवहार पूर्ण न झाल्यास त्वरित पैसे निघाल्याची सूचना तपासा.
  • तुम्ही तुमच्या खात्यात किती रक्कम आहे आणि त्यातून पैसे कट तर झाले नाहीत ना याची माहिती लगेच तपासा.
  • जर एटीएममधून पैसे न काढता खात्यातून पैसे कापले गेले असतील तर तुम्ही 5 दिवस वाट पाहावी. बहुतेक असं दिसून येतं की पाच दिवसांत पैसे खात्यात परत केले जातात.
  • पाच दिवस उलटूनही खात्यात पैसे परत आले नाहीत, तर तुम्ही व्यवहार अयशस्वी झाल्याबद्दल बँकेच्या शाखेकडे तक्रार करू शकता.
  • बँकेत तक्रार केल्यानंतर ३० दिवसांच्या आत तुमच्या खात्यात पैसे परत आले नाहीत, तर तुम्ही तक्रार निवारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता.

ऑनलाइन तक्रार करू शकता- जर स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल बोलायचं झालं तर, जर आरबीआयनं ठरवून दिलेल्या वेळेनंतरही पैसे परत केले नाहीत, तर तुम्ही https://crcf.sbi.co.in/ccf/ या वेबसाइटवर जाऊन तक्रार दाखल करू शकता. याशिवाय SBI हेल्पलाइन क्रमांक 1800 11 2211 (टोल-फ्री), 1800 425 3800 (टोल-फ्री) वर कॉल करून तक्रार केली जाऊ शकतात. यासोबतच सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत 080-26599990 या क्रमांकावर कॉल करूनही तक्रार करता येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM , sbi ATM
  • First Published :
जाहिरात
जाहिरात