जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Loan Appवरुन कर्ज घेताना काय काळजी घ्याल? तुमची फसवणूक होऊ नये यासाठी 'या' गोष्टी तपासा

Loan Appवरुन कर्ज घेताना काय काळजी घ्याल? तुमची फसवणूक होऊ नये यासाठी 'या' गोष्टी तपासा

Loan Appवरुन कर्ज घेताना काय काळजी घ्याल? तुमची फसवणूक होऊ नये यासाठी 'या' गोष्टी तपासा

Loan App: अॅपवरून कर्ज घेण्यापूर्वी ते कोणती कंपनी चालवत आहे हे जाणून घेतले पाहिजे. कोणत्या कंपनीने ते अॅप बनवले? यासोबतच कंपनीचा ट्रॅक रेकॉर्डही तपासावा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 20 जुलै : आर्थिक गरजेच्या वेळी पर्सनल लोन हा पैसे उभे करण्याचा सोपा मार्ग आहे. सध्याच्या ऑनलाईन युगात इंस्टंट लोन सहज उपलब्ध होते. रोज अनेक फोन तुम्हाला देखील येत असतील. आजच्या काळात इंटरनेटवर असे अनेक अॅप्स आहेत जे स्वस्त कर्ज देण्याचे आश्वासन देतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लोक कर्ज घेतात. यातील काही अॅप्स धोकादायक देखील ठरु शकतात. कारण अशा अॅप्सद्वारे फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशावेळी तुम्ही निवडलेला अॅप खरा आहे की खोटा कसं तपासणार, याबाबत माहिती घेऊ. अॅप डाउनलोड करण्यापूर्वी, आपण ते कोणत्या बँकेशी संबंधित आहे ते तपासले पाहिजे. यासह नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी कोणती आहे? Google पॉलिसीनुसार, कोणत्याही लोन अॅपशी संबंधित काही NBFC असणे आवश्यक आहे. जर अॅपशी कोणतीही बँक जोडलेली नसेल तर तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. अॅप कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा अॅपवरून कर्ज घेण्यापूर्वी ते कोणती कंपनी चालवत आहे हे जाणून घेतले पाहिजे. कोणत्या कंपनीने ते अॅप बनवले? यासोबतच कंपनीचा ट्रॅक रेकॉर्डही तपासावा. कंपनीची वेबसाइट, संपर्क तपशील, कार्यालयाचा पत्ता तपासणे आवश्यक आहे. त्याचे कार्यालय भारतात कुठे आहे? याची देखील माहिती घेणे आवश्यक आहे. Online Tax Filing App: ऑनलाइन रिटर्न भरताना होणारा त्रास संपणार, टाटाच्या ‘या’ अ‍ॅपमध्ये आहेत उत्तम सुविधा कर्ज अॅप डाउनलोड करण्यापूर्वी, त्याचे रेटिंग आणि रिव्ह्युव्ह वाचले पाहिजे. यासंबंधीचे सर्व तपशील तुम्हाला अॅप स्टोअरवर मिळतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका अहवालात म्हटले आहे की, अँड्रॉइड यूजर्सवर चालणाऱ्या वेगवेगळ्या अॅप स्टोअर्सवर सुमारे 600 बेकायदेशीर लोन अॅप्स उपलब्ध आहेत. PM Kisan योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देऊ नका, शिक्षेसह आर्थिक फटका बसू शकतो पर्सनल डेटा चोरीचा धोका बनावट अॅप्स यूजर्सकडून अनेक प्रकारची माहिती घेतात. यामुळे पर्सनल डेटा लीक होण्याचा धोकाही वाढतो. तर चांगले अॅप जास्त माहिती विचारत नाही. कारण त्याला फक्त आवश्यक माहिती हवी असते. जसे मोबाईल, बँक खाते, जन्मतारीख आणि नाव इत्यादी माहिती त्यांना हवी असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: apps , loan , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात