नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : महागाई कधी कमी होणार? हा सध्याचा सर्वसामान्यांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. महागाईमुळे अनेकांच्या घराचं बजेट कोलमडलं आहे. या सर्वासाठी एक दिलासादायक बातमी आहे. सरकारच्या धोरणात्मक उपायांमुळे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणात्मक उपाययोजनांमुळे चालू आर्थिक वर्षात आर्थिक वाढ, महागाई आणि जागतिक समतोल या बाबतीत देश दोन महिन्यांपूर्वीच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे, अर्थ मंत्रालयाच्या मासिक आर्थिक आढाव्यात सांगण्यात आलं आहे. जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमती नरमल्याने, मध्यवर्ती बँकेची धोरणात्मक पावले आणि सरकारची वित्तीय धोरणे येत्या काही महिन्यांत महागाईच्या दबावाला आळा घालतील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. भारतात महागाईचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात अनेक वस्तूंचे दर घसरल्यामुळे दिलासादायक चित्र या अहवालातून निर्माण झालं आहे. देशांतर्गत उत्पादन प्रक्रियेत या कच्च्या मालाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. किरकोळ महागाईचा दर जुलै 2022 मध्ये 6.7 टक्क्यांवर आला आहे, जो मागील महिन्यात 7.01 टक्क्यांवर होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2022-23 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 7.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. Baroda Tiranga Deposit Scheme: या बँकेनं आणली ‘तिरंगा डिपॉझिट स्कीम’; 31 डिसेंबरपर्यंत पैसे जमा केल्यास मिळेल आकर्षक व्याज औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक आणि आठ प्रमुख उद्योगांची कामगिरी औद्योगिक क्रियाकलापांची ताकद दर्शवते, असं अहवालात म्हटलं आहे. त्याच वेळी, पीएमआय उत्पादन जुलैमध्ये आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले. हे नवीन व्यवसाय आणि उत्पादनात वाढ दर्शवते. वित्त मंत्रालयाच्या मते, रशिया-युक्रेन युद्धापासून, गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे देशातून भांडवल बाहेर पडू लागले. ही परिस्थिती केवळ भारतातच नाही तर इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये आहे. भारताव्यतिरिक्त, इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या चलनांच्या विनिमय दरातही अमेरिकन डॉलरच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान घसरण झाली. तुमची पहिला कार खरेदीसाठी उत्पन्नानुसार योग्य वेळ तपासा, जेणेकरुन आवडती कार डोकेदुखी होणार नाही
अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, खाजगी क्षेत्र आणि बँकांची बॅलेन्स शीट चांगली आहेत. कर्ज घेण्याचा आणि कर्ज देण्याचं प्रमाण वाढत आहे. वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे व्यापार संतुलनासारखे काही अडथळे वगळता, पुढील आर्थिक वर्ष 2023-24 मध्येही आर्थिक विकासाचा वेग कायम राहील असे दिसत.