मुंबई,18 ऑगस्ट: बँक ऑफ बडोदाने (BOB) ग्राहकांसाठी नवीन ठेव योजना आणली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी दिवशी बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी ‘बडोदा तिरंगा ठेव योजना’ (Baroda Tiranga Deposit Scheme) या नावानं एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेत ग्राहकांना स्पेशल डोमेस्टिक रिटेल टर्म डिपॉझिट अंतर्गत जमा केलेल्या पैशावर व्याज मिळेल. बँकेच्या म्हणण्यानुसार, या योजनेंतर्गत जमा केलेल्या पैशांवर 6 टक्के व्याजदर मिळेल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जाईल. तसेच, नॉन-कॅपेबल ठेवीदारांना 0.15 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. ठेवीचा कालावधी- बँक ऑफ बडोदाच्या (BOB) या ठेव योजनेत ग्राहक दोन टर्मसाठी पैसे जमा करू शकतात. जर एखाद्या ग्राहकानं बडोदा तिरंगा योजनेत 444 दिवस (14 महिन्यांपेक्षा जास्त) पैसे जमा केले तर त्याला 5.75 टक्के दराने व्याज मिळेल. त्याच वेळी, जे ग्राहक 555 दिवस पैसे जमा करतात त्यांना 6 टक्के दरानं व्याज मिळेल. ही योजना 16 ऑगस्ट 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत आहे. ऑनलाइन देखील करू शकता फिक्स्ड डिपॉझिट- बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक अजय खुराणा म्हणाले की, ‘बडोदा तिरंगा ठेव योजनेला बँक ऑफ बडोद्वारे सुरु केली आहे. ही भारतातील आघाडीची आणि सर्वात विश्वासार्ह बँक आहे. यामध्ये दोन टप्प्यांमध्ये पैसे जमा करण्याचा पर्याय सादर करण्यात आला आहे. ते असंही म्हणाले की, तिरंगा डिपॉझिट योजनेतून ग्राहकांना ठेवींवर अधिक नफा मिळविण्याची संधी मिळेल. अजय खुराणा यांनी सांगितले की, बँक ऑफ बडोदाचे ग्राहक BOB वर्ल्ड वापरून मोबाईलद्वारे ऑनलाइन मुदत ठेव सुरू करू शकतात. हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ ठेवींवर लागू होतो. हेही वाचा- प्रीमियम न भरल्यानं पॉलिसी बंद झालीये? LIC देत आहे डिस्काउंट ऑफर या महिन्यापासून नवीन चेक नियम लागू- बँक ऑफ बडोदाने या महिन्यापासून चेकने पैसे देण्याचे नियम बदलले आहेत. बँक ऑफ बडोदाने 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेक पेमेंटसाठी 1 ऑगस्टपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली आहे. याअंतर्गत चेक जारी करणाऱ्याला चेकशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे बँकेला द्यावी लागेल. त्यानंतरच चेक क्लिअर होईल. जर एकापेक्षा जास्त धनादेश जारी केले तर त्याची संख्या, देयकाची रक्कम आणि प्राप्तकर्त्याचे नाव यासह अनेक तपशील बँकेला प्रदान करावे लागतील. बँकिंग फसवणूक रोखण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने 2020 मध्ये धनादेशांसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरू केली. या प्रणालीद्वारे चेकद्वारे 50,000 पेक्षा जास्त पेमेंटसाठी काही महत्त्वाची माहिती आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.