मुंबई, 19 जुलै: भारतीय रेल्वेनं (Indian Railways) प्रवाशांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. तिकीट रिफंडच्या (Ticket Refund Fraud) बाबतीत केव्हाही देताना काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा, फसवणूक करणारं तुमचे बँक खाते रिकामं करू शकतात. IRCTC रिफंड प्रक्रियेबाबत रेल्वेनं सर्व प्रवाशांना सतर्क केलं आहे. ट्विटरवर माहिती देताना रेल्वेंनं सांगितले की, घोटाळेबाज ट्विटरवर IRCTC वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. तसेच त्यांच्या बुकिंग, रिफंड आणि टीडीआरबद्दल प्रश्न उपस्थित करतात आणि लिंक किंवा फोन कॉलद्वारे त्यांच्या समस्या सोडवण्याचा दावा करतात. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांनी कधीही कोणत्याही लिंक किंवा संशयास्पद कॉलला उत्तर देऊ नये. अन्यथा, तुमच्या UPI हँडलच्या माध्यमातून खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. IRCTC अधिकाऱ्यांनी सांगितलं की, असे लोक वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत असतात आणि नंतर काही लिंक पाठवतात आणि रिफंड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँक तपशील किंवा UPI माहिती मिळवतात किंवा UPI अॅपवर लिंक पाठवतात. अशा परिस्थितीत, या लिंकवर कधीही क्लिक करू नका किंवा तुमचा UPI संबंधित पिन देऊ नका. तिकीट रद्द केल्यावर प्रवाशांच्या खात्यात पैसे आपोआप जमा होतात, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले की, आयआरसीटीसी रिफंडमध्ये कोणत्याही प्रकारचे फोन कॉल प्राप्त करणं किंवा लिंकवर क्लिक करणं याशिवाय अधिकाऱ्याचं नाव मिळविण्याची प्रक्रिया समाविष्ट नाही. त्यामुळे लिंक किंवा कॉलला उत्तर देऊ नका. हेही वाचा: Electricity bill: वीजबिल येईल 3 हजार रुपयांनी कमी! ताबडतोब घरातून काढा ‘हे’ डिव्हाइस बनावट कॉलच्या तक्रारींनंतर अधिकाऱ्यांचे हे वक्तव्य समोर आलं आहे. अलीकडेच एका ट्विटर वापरकर्त्याने फसवणूक कॉलबद्दल पोस्ट केलं आणि रेलसेवेला टॅग केलं. त्यांनी तत्काळ तक्रारीची दखल घेतली आणि त्रासमुक्त प्रक्रियेसाठी पीएनआर क्रमांक आणि मोबाइल क्रमांक मागितला. नंतर रेल्वे सेवेच्या अधिकाऱ्यांनी पीडितेला तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी लिंक दिली. तिकिटाचे पैसे परत न केल्याची तक्रार आणखी एका युजरने शेअर केली. यानंतर आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी ट्रान्झॅक्शन आयडीसह पीएनआर नंबर आणि मोबाइल नंबर मागितला. त्या व्यक्तीला दोन फसवणुकीचे कॉल आणि व्हॉट्सअॅपवर लिंक मिळाली. कॉलर्सनी फक्त गुगल फॉर्म भरून रिफंडचा दावा केला होता. रेल सेवा हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे, जो रेल्वे युजर्सना सपोर्ट करतो. या प्लॅटफॉर्मवर रेल्वेशी संबंधित कोणताही प्रश्न, जसे की ट्रेनला होणारा विलंब, अयोग्य फीडिंग, स्वच्छता इत्यादी संबंधित कामांविषयी माहिती आणि तक्रारींचे निवारण करून हाताळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.