मुंबई, 14 एप्रिल : रेल्वेचं तिकीट (Railway Ticket) काढताना प्रवाशांची होत असलेल्या मोठ्या त्रासातून सुटका मिळाली आहे. तिकीट बुकिंगबाबत (Ticket Booking) भारतीय रेल्वेने (Indian Railway) बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना यापुढे तिकीट काढताना त्यांना जिथे जायचे आहे त्या ठिकाणचा पत्ता भरावा लागणार नाही. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) महामारीमुळे, रेल्वे तिकीट बुक करताना IRCTC वेबसाइट आणि अॅपवर डेस्टिनेशन पत्ता भरणे अनिवार्य करण्यात आले होते. ते भरल्याशिवाय तिकीट काढता येत नव्हते. त्यामुळे नागरिकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. बँक ऑफ बडोदाकडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 19 एप्रिलला लिलाव, आजच करा रजिस्ट्रेशन कोरोना निर्बंधांनुसार पत्ता भरणे आवश्यक होते रेल्वे मंत्रालयाने डेस्टिनेशनबाबत आदेश जारी केला आहे. डेस्टिनेशन अॅड्रेसने साथीच्या आजारादरम्यान कोविडच्या पॉझिटिव्ह केसेस शोधण्यात मदत केली. जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा त्याला रोखण्यासाठी अनेक निर्णय घेतले गेले. मग रेल्वेनेही अनेक निर्बंध लागू केले. हा देखील त्यापैकीच एक होता. रेल्वेने अनेक दिवस गाड्या बंद ठेवल्या होत्या. यानंतर गाड्या परत सुरू करतानाही अनेक तरतुदी लागू ठेवण्यात आल्या होत्या. Whatsapp चा UPI यूजर्स वाढवण्याचा मार्ग मोकळा; Phonepe, Google Pay शी थेट स्पर्धा
तसेच अलीकडेच रेल्वेने पुन्हा एकदा डब्यात प्रवाशांना उशी-ब्लँकेट परत देण्यास सुरुवात केली आहे. आता विविध गाड्यांमधील प्रवाशांना रात्री झोपण्यासाठी उशा आणि ब्लँकेट दिले जात आहेत, महामारीच्या काळात हे देखील बंद करण्यात आले होते.