मुंबई, 11 सप्टेंबर : रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर हळूहळू बँकांनी आपल्या FD व्याजदरात वाढ करत आहेत. जर तुम्हीही बँकेत FD केली असेल तुम्हाला याचा फायदा होईल. अलीकडेच दोन बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. एफडीवरील व्याजदरात वाढ झाल्याने आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. इंडियन ओव्हरसीज बँक आणि अॅक्सिस बँक यांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. जिथे अॅक्सिस बँकेने 9 सप्टेंबरपासून नवीन व्याजदर लागू केले आहेत. तर इंडियन ओव्हरसीज बँक 13 सप्टेंबरपासून नवीन व्याजदर लागू करणार आहे.
ELSS की PPF, गुंतवणुकीसह मिळेल कर बचतीचा लाभ; तपासा कोणती योजना ठरेल फायदेशीर?
इंडियन ओव्हरसीज बँकेने व्याजदरात किती वाढ केली? इंडियन ओव्हरसीज बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 7 - 29 दिवसांपर्यंत मुदत असलेल्या FD वर 3 टक्के - 3.25 टक्के व्याजदर वाढवला आहे. त्याचप्रमाणे 46-90 दिवसांच्या मुदतीच्या FD वरील व्याजदर 3.75 टक्के करण्यात आला आहे. आता ग्राहकांना 91-179 दिवसांच्या FD वर 4.10 टक्के दराने व्याज दिले जात आहे. प्रॉपर्टीवर जास्तीत-जास्त रिटर्न हवाय? ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या अॅक्सिस बँकनेही व्याजदर वाढवले अॅक्सिस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 7 दिवस- 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या FD वर 2.75 टक्के - 5.75 टक्के व्याजदर वाढवला आहे. 7-29 दिवसांच्या FD वर व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढवून 2.75 टक्के करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, 30-90 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर 3 टक्क्यांनी वाढवून 3.25 टक्के करण्यात आला आहे. आता ग्राहकांना 3-6 महिन्यांच्या मुदतीच्या FD वर 3.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे, पूर्वी हा दर 3.50 टक्के होता. अधिक माहितीसाठी, ग्राहक बँकेच्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकतात.