मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Indian Economy : ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, कोणते देश भारताच्या पुढे?

Indian Economy : ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, कोणते देश भारताच्या पुढे?

ब्रिटन सध्या अनेक संकटातून जात आहे, ज्यात महागाई, कमी वाढ आणि राजकीय अस्थिरता यांचा समावेश आहे. त्याच वेळी, भारत दीर्घ काळापासून जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • mumbai, India
  • Published by:  Pravin Wakchoure

नवी दिल्ली : भारताने जागतिक स्तरावर आपली आर्थिक ताकद दाखवून दिली आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे.

भारताच्या मागे पडणे हा ब्रिटनसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ब्रिटन सध्या अनेक संकटातून जात आहे, ज्यात महागाई, कमी वाढ आणि राजकीय अस्थिरता यांचा समावेश आहे. त्याच वेळी, भारत दीर्घ काळापासून जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

Gold Price: सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 46000 रुपयांपर्यंत घसरणार? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

पहिल्या तिमाहीत GDPमध्ये 13.5 टक्के दर वाढ

कृषी आणि सेवा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) देशाचा जीडीपी 13.5 टक्के राहिला. या वाढीसह, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. 2022 च्या एप्रिल-जून तिमाहीत चीनचा विकास दर 0.4 टक्के राहिला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील आर्थिक वर्षाच्या (2021-22) एप्रिल-जून तिमाहीत GDP वाढीचा दर 20.1 टक्के होता. 2021 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत GDP वाढीचा दर 8.4 टक्के, ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 5.4 टक्के आणि जानेवारी-मार्च 2022 मध्ये 4.1 टक्के होता.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दररोज भरा 95 रुपये अन् मिळवा 14 लाख; काय आहे योजना?

वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी देखील सांगितलं होतं की, भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 7 टक्क्यांहून अधिक विकास दर गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर भाष्य करताना ते म्हणाले की, कोरोना महामारीपूर्व पातळीपासून अर्थव्यवस्था 4 टक्क्यांनी वर आहे. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या 6.4 टक्क्यांवर ठेवण्याचा सरकारला विश्वास आहे, असे सांगून त्यांनी वाढत्या आयातीमुळे वित्तीय स्थितीवर दबाव आणण्याची चिंता दूर केली.

दुसऱ्यांदा भारत पाचव्या स्थानावर

IMFच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये देखील, भारताची अर्थव्यवस्था नाममात्र GDP च्या बाबतीत 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आणि ती 2.9 ट्रिलियन डॉलर इतकी राहिली. त्याच वेळी, यूकेची अर्थव्यवस्था 2.8 ट्रिलियन डॉलर्ससह सहाव्या स्थानावर आली होती.

First published:

Tags: Economy, India, Money