मराठी बातम्या /बातम्या /मनी /

अदानींच्या नेटवर्थमध्ये मोठी उसळी; बनले आशिया खंडातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

अदानींच्या नेटवर्थमध्ये मोठी उसळी; बनले आशिया खंडातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकत आशिया खंडातील दुसरे श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे.

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकत आशिया खंडातील दुसरे श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे.

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकत आशिया खंडातील दुसरे श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 21 मे : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकत आशिया खंडातील दुसरे श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. मंगळवारी अदानी समूहाच्या कंपन्यांना देशांतर्गत शेअर बाजारामध्ये सलग दुसर्‍या दिवशी प्रचंड फायदा झाला. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) वर दर्शवण्यात आलेल्या नव्या आकड्यांनुसार आता गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 66.5 अरब डॉलर येवढी झाली आहे. तर चीनच्या झोंग शानशान यांची एकूण संपत्ती 63.6 अरब डॉलर येवढी आहे. तर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे सध्या आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून ते पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.

नेटवर्थमध्ये जबरदस्त उसळी

ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या माहितीनुसार गौतम अदानी यांना नेटवर्थमध्ये (Networth) 2.74 अरब डॉलरची भरघोस वाढ झाली आहे. यापूर्वी पहिल्या सोमवारी त्यांची नेटवर्थमध्ये 3.31 अरब डॉलर म्हणजेच जवळपास 24,233 कोटी रुपयांची मोठी वाढ झाली होती. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये 6.05 अरब डॉलर वाढ झाली आहे. या भरघोस वाढीसह ते आता 66.5 अरब डॉलर्सच्या नेटवर्थसह जगातील श्रीमंतांच्या यादीत 6 क्रमांकानी वरती झेप घेत 14 व्या क्रमांकावर येवून पोहचले आहेत.

हे वाचा-या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! Appraisal फॉर्म भरण्याची तारीख वाढवली

या कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत

गौतम अदानी सध्या देश आणि आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून अदानी समूहाच्या सहा कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. मंगळवारी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. अदानी एंटरप्राइजेसचा शेअर 3.06 टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल झोन लिमिटेडचा शेअर 2.85 टक्क्यांनी, अदानी टोटल गॅसचा शेअर 3.90 टक्क्यांनी, अदानी ट्रान्समिशनचा शेअर 5 टक्क्यांनी आणि अदानी पॉवरचा शेअर 5 टक्क्यांनी वाढला आहे. याबरोबरच अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये 4.94 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. अदानी ग्रुपच्या 5 कंपन्यांचा मार्केट कॅप तब्बल एक लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.

हे वाचा-ITR Filing : आर्थिक वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

हे आहेत जगातील सर्वात श्रीमंत 5 व्यक्ती

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या रँकिंगनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेझॉनचे जेफ बेजोस हे आहेत. 163 बिलियन डॉलर संपत्तीसह दुसऱ्या नंबरवर टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे आहेत. याशिवाय तिसऱ्या नंबरवर बर्नाड अनॉल्ट, चौथ्या क्रमांकावर बिल गेट्स आणि पाचव्या क्रमांकावर मार्क झुकेरबर्ग यांचा नंबर आहे.

First published:

Tags: Business News, Richest man in india