जाहिरात
मराठी बातम्या / मनी / नवीन आणि जुन्या टॅक्स स्लॅबपैकी कोणता फायदेशीर? जास्त सूट कुठे मिळेल? चेक करा डिटेल्स

नवीन आणि जुन्या टॅक्स स्लॅबपैकी कोणता फायदेशीर? जास्त सूट कुठे मिळेल? चेक करा डिटेल्स

नवीन आणि जुन्या टॅक्स स्लॅबपैकी कोणता फायदेशीर? जास्त सूट कुठे मिळेल? चेक करा डिटेल्स

नवीन कर प्रणालीमध्ये, 15 लाख आणि त्याहून अधिक वार्षिक उत्पन्नावर सर्वाधिक कर आकारला जातो. ही व्यवस्था अशा करदात्यांना फायदेशीर आहे जे कमी सूट आणि कपातीचा दावा करतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 फेब्रुवारी : आर्थिक वर्ष 2020-21 साठी इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी निघून गेली आहे. जर तुम्ही ITR दाखल करू शकत नसाल तर तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत उशीर झालेला ITR दाखल करू शकता. आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत (ITR last date) संपल्यानंतर, करदात्याला उशीर झालेला ITR भरण्याची संधी असते. 2020 च्या अर्थसंकल्पात कर भरण्यासाठी दोन पर्याय देण्यात आले होते. जुना आणि नवीन कर स्लॅब (Old and New Tax Slab). करदाते त्यांच्या कर दायित्वानुसार दोन कर स्लॅबपैकी कोणताही एक निवडू शकतात. क्लियर संस्थापक आणि सीईओ अर्चित गुप्ता यांनी म्हटलं की, नवीन कर स्लॅब जुन्या स्लॅबपेक्षा दोन प्रकारे भिन्न आहे. पहिल्या टॅक्स स्लॅबमध्ये कमी दरांसह अधिक स्लॅब आहेत. तर दुसऱ्या नवीन सिस्टमचा अवलंब केल्याने, तुम्हाला जुन्या कर स्लॅबमध्ये उपलब्ध असलेल्या सुमारे 70 प्रकारच्या सूट आणि कपातीचा लाभ मिळणार नाही. स्वत:चं घर घ्यायचं आहे पण Down Payment मुळे अडलंय काम? फंड मिळवण्यासाठी हे आहेत पर्याय कोणता टॅक्स स्लॅब चांगला? अर्चित गुप्ता म्हणतात की करदात्यांनी त्यांच्या उत्पन्नावरील सर्व प्रकारच्या सूट आणि कपातीचा लाभ घेतल्यानंतर लागू असलेल्या सामान्य दरांवर कर दायित्वाची गणना केली पाहिजे. उदाहरणार्थ, जुन्या स्लॅब अंतर्गत पगारदार व्यक्ती LTA, HRA, स्टॅन्डर्ड डिडक्शनसाठी 50,000 रुपयांच्या सूटचा दावा करू शकते. याव्यतिरिक्त, वैयक्तिक करदाता गृह कर्ज आणि NPS योगदान इत्यादीवरील व्याजावर आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकतो. याव्यतिरिक्त, करदात्याने नवीन कर स्लॅबनुसार त्याच्या कमाईवरील कर दायित्वाची गणना करणे आवश्यक आहे. या दोघांची तुलना करून, तुम्ही स्वतःसाठी एक चांगला कर स्लॅब निवडू शकता. नवीन स्लॅबमध्ये कुणाला लाभ मिळणार नवीन कर प्रणालीमध्ये, 15 लाख आणि त्याहून अधिक वार्षिक उत्पन्नावर सर्वाधिक कर आकारला जातो. ही व्यवस्था अशा करदात्यांना फायदेशीर आहे जे कमी सूट आणि कपातीचा दावा करतात. जे उच्च कर स्लॅबमध्ये येतात आणि ज्यांनी कर वाचवण्यासाठी आवश्यक गुंतवणूक केली आहे, त्यांना या व्यवस्थेचा फारसा फायदा होणार नाही. ज्यांना नवीन स्लॅब दरांचा अवलंब करायचा आहे, त्यांना स्टँडर्ड डिडक्शन, 80C, 80D, हाउसिंग लोन, NPS यांसारख्या सर्व सूट सोडून द्याव्या लागतील. रेल्वे तिकीट ऑनलाईन बूक करताना Travel Insurance घ्या, अनेक फायदे मिळतात 30 पेक्षा कमी वयोगटासाठी नवीन प्रणाली चांगली जर करदात्यांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्यांच्यासाठी नवीन कर स्लॅब निवडणे चांगले होईल. पण यापेक्षा मोठे करदाते जुन्याच व्यवस्थेत राहिले तर बरे होईल. 10 लाख रुपयांपेक्षा कमी कमाई असलेल्या लोकांसाठी नवीन प्रणाली अधिक चांगली असू शकते. यापेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांनी जुन्याच व्यवस्थेत राहणे योग्य ठरेल. गृहकर्ज चालू असेल तर गृहकर्जाची परतफेड करणे योग्य ठरेल. या प्रकरणात, कपातीचा लाभ मिळेल. जे मुलांच्या शाळेची फी भरतात, त्यांच्यासाठी जुन्या पद्धतीत राहणे चांगले होईल कारण फीवरील कर सवलतीचा फायदा घेता येईल. निवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा पगारदार किंवा पेन्शनधारक, ज्याला व्यवसायातून कोणतेही उत्पन्न नाही, ते दरवर्षी नवीन किंवा जुन्या कर प्रणालीतील कोणतीही एक निवडू शकतात. जर उत्पन्नाचा स्रोत व्यवसाय असेल, तर नवीन प्रणाली निवडल्यानंतर, एखादी व्यक्ती फक्त एकदाच जुन्या कर प्रणालीकडे परत येऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात