Home /News /money /

Income Tax Return: करदात्यांना आता ऑनलाइनच भरावा लागेल ITR, 'CBDT'ने दिली महत्त्वाची माहिती

Income Tax Return: करदात्यांना आता ऑनलाइनच भरावा लागेल ITR, 'CBDT'ने दिली महत्त्वाची माहिती

आयकर पोर्टलमधील (Income Tax Portal) अडचणींमुळे ज्या करदात्यांनी अद्याप प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच आयकर रिटर्न (ITR Filing) दाखल केलेला नाही, ते 5000 रुपयांच्या दंडासह आयकर रिटर्न 31 मार्च 2022 पर्यंत भरू शकतात.

नवी दिल्ली, 19 जानेवारी: आयकर पोर्टलमधील (Income Tax Portal) अडचणींमुळे ज्या करदात्यांनी अद्याप प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच आयकर रिटर्न (ITR Filing) दाखल केलेला नाही, ते 5000 रुपयांच्या दंडासह आयकर रिटर्न 31 मार्च 2022 पर्यंत भरू शकतात. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) ऑडिट रिपोर्ट (Tax Audit Reports) आणि आयकर रिटर्नचे फिजिकल फायलिंग (Physical Filing of ITR) यापुढे सुरू राहणार नाही, असं स्पष्ट केलंय. गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) केंद्र सरकारला (Central Government) आयकर पोर्टलच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन रिटर्न भरण्यासाठी फिजिकल फायलिंग करण्याची परवानगी देण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते. दक्षिण गुजरात इन्कम टॅक्स बार असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि आयटीआरची फिजिकल कॉपी जमा करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. हे वाचा-Petrol Diesel Price Today: IOCL कडून इंधर दर जारी,तपासा मुंबई-पुण्यातील आजचा भाव 'सीबीडीटी' ने व्यवहार्य पद्धतीचा अवलंब करावा गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. बी. पार्दीवाला आणि न्यायमूर्ती निशा एम. ठाकोर यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, 'आयकर पोर्टलच्या उणीवा लक्षात घेऊन सरकारने फिजिकल फायलिंगला परवानगी द्यावी. तसंच सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने आयटीआर भरण्यासाठी व्यवहार्य पद्धतीचा अवलंब करावा.' यावर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, 'जर सरकारने आयकर पोर्टलच्या त्रुटी लक्षात घेऊन फिजिकल फायलिंगला परवानगी दिली, तर त्याचा करदात्यांना फायदाच होईल.' मुदत वाढवण्याची मागणी चार्टर्ड अकाउंटंटच्या एका गटाने या संदर्भात जनहित याचिकाही दाखल केली होती. नवीन प्राप्तिकर पोर्टल व्यवस्थित काम करत नसल्याने 2021-22 च्या आर्थिक वर्षासाठी टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि आयटीआर भरण्याची मुदत वाढवली जावी, असे या याचिकेत म्हटलं होतं. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने यावर सांगितले की, 'आयकर अधिकाऱ्यांनी रिटर्न भरताना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात.' मात्र, 'सीबीडीटी'ने स्पष्ट केलयं की, 'करदात्यांना आता फक्त ऑनलाइन आयटीआर भरावा लागेल. फिजिकल फायलिंग आता शक्य नाही.' हे वाचा-Budget 2022 : देशाच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असतं? जाणून घ्या सविस्तर कोरोना महामारीमुळे आयकर रिटर्न भरण्याची मुदत केंद्र सरकारने वेळोवेळी वाढवली होती. मात्र,अनेकांना आयकर पोर्टलमध्ये येत असलेल्या अडचणींमुळे मुदतीत आयटीआर भरणे शक्य झाले नाही. पोर्टलमध्येच अडचण येत असल्याने पुन्हा एकदा मुदत वाढवली जाईल, अशी आशा अनेक करदात्यांना होती. मात्र, आता ज्यांचा आयटीआर भरणं बाकी आहे, त्यांना तो 5000 रुपये दंडासह भरावा लागणार आहे.
First published:

Tags: Income tax

पुढील बातम्या