मराठी बातम्या /बातम्या /मनी /

70 हजार पगार अन् 22 कोटींची संपत्ती, भ्रष्ट अधिकारी ACBच्या जाळ्यात

70 हजार पगार अन् 22 कोटींची संपत्ती, भ्रष्ट अधिकारी ACBच्या जाळ्यात

70 हजार पगार अन् 22 कोटींची संपत्ती, भ्रष्ट अधिकारी ACBच्या जाळ्यात

70 हजार पगार अन् 22 कोटींची संपत्ती, भ्रष्ट अधिकारी ACBच्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईमध्ये जयपूरच्या दोन सरकारी अधिकाऱ्यांकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडली आहे. प्रतिभा कमल आणि दीपक गुप्ता अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. जयपूरच्या उच्चभ्रू भागात जमीन आणि एका आलिशान हॉटेलचाही या मालमत्तेत समावेश आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 डिसेंबर:  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईमध्ये जयपूरच्या दोन सरकारी अधिकाऱ्यांकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडली आहे. प्रतिभा कमल आणि दीपक गुप्ता अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. जयपूरच्या उच्चभ्रू भागात जमीन आणि एका आलिशान हॉटेलचाही या मालमत्तेत समावेश आहे. दोघांकडे अनुक्रमे सुमारे 6.5 कोटी आणि 16.31 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं उघड झालं आहे. एसीबीकडे दोन महिन्यांपूर्वी या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात तक्रार आली होती.

प्रतिभा कमल या माहिती आणि तंत्रज्ञान विभागात (डीओआयटी) माहिती सहायक पदावर कार्यरत होत्या. दीपक गुप्ता हे जयपूर विद्युत वितरण निगम लिमिटेडमध्ये सहायक लेखाधिकारी होते. गुप्ता यांना मासिक 70 हजार रुपये पगार आहे. असं असतानाही त्यांच्याकडे, तसंच प्रतिभा यांच्याकडे उत्पन्नाच्या किती तरी पट अधिक आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आढळली आहे. एसीबीचे डीजी बीएल सोनी म्हणाले, की दोन महिन्यांपूर्वी गुप्त माहिती मिळाली होती, की डीओआयटीच्या माहिती सहायक प्रतिभा कमल आणि डिस्कॉमचे एएओ दीपक गुप्ता मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार करत आहेत.

हेही वाचा: तरुणाकडून छेडछाडीचा जाच, कंटाळून बीडमध्ये 23 वर्षीय तरुणीचं भयानक पाऊल

मंगळवारी सकाळी (6 डिसेंबर) सात वाजता अतिरिक्त एसपी ललित शर्मा आणि पुष्पेंद्र सिंह राठोड यांच्या नेतृत्वाखाली 100 कर्मचाऱ्यांच्या सात टीम तयार करून ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. एसीबीनं बुधवारी (7 डिसेंबर) दीपक गुप्ता (पीएनबी बँक) आणि प्रतिभा कमल (महाराष्ट्र बँक) यांच्या बँक लॉकर्सचीही झडती घेतली. दोघांचे हे लॉकर्स रिकामे आढळून आले. प्रतिभा कमल यांची जयपूरमधल्या विविध बँकांमध्ये 11 खाती आहेत. दीपक गुप्ता यांची चार बँक खाती समोर आली आहेत.

दीपक गुप्ता हे मूळचे बस्सी बनारा येथील रहिवासी आहेत. 1995मध्ये त्यांना वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. 2005मध्ये विभागीय परीक्षा देऊन ते कनिष्ठ लेखापाल झाले. विभागीय अधिकाऱ्यांकडे दीपक गुप्ता यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी सातत्याने येत होत्या;. मात्र त्यांची एकदाही जयपूरबाहेर बदली झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची बदली होताच नेते ती रद्द करत असत.

एसीबीचे डीजी बीएल सोनी यांनी सांगितलं, की एसीबीच्या तपासात दीपक कुमार यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 1200 टक्के जास्त मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे. प्रतिभा कमल यांच्याकडे उत्पन्नाच्या 1300 टक्के जास्त मालमत्ता आहे. दीपक यांच्या नावे जयपूरमध्ये 17 भूखंड आढळले आहेत. यामध्ये घरं, दुकानं, जमीन आणि फ्लॅटचा समावेश आहे. याशिवाय म्युच्युअल फंड, विमा इत्यादींमध्ये गुंतवणूक आहे. आरोपी दीपक यांनी चित्रकूटमध्ये आधुनिक सुविधांसह (होम थिएटर, लिफ्ट, जिम) आलिशान बंगला बांधला आहे. याशिवाय मानसरोवर जयपूरमध्ये एक हॉटेलही त्यांनी बांधलं आहे. त्यांच्या जयपूरमधल्या घरातून 14.33 लाख रुपये रोख, 1.30 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या दागिन्यांमध्ये तीन नेकलेस, दोन ब्रेसलेट, सहा सोन्याच्या चेन, सोन्याच्या बांगड्या सापडल्या आहेत. त्याचबरोबर 20 किलो चांदीचे दागिनेही सापडले आहेत.

बीएल सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा कमल यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. त्यांना सध्या माहिती सहायक पदावरून निलंबित करण्यात आलं आहे. त्यांनी जयपूरमध्ये घर, दुकान, जमीन, फ्लॅट, म्युच्युअल फंड, विमा यामध्ये गुंतवणूक केली आहे. प्रतिभा कमल या परवानगीशिवाय परदेशात गेल्यावर एसीबीच्या रडारवर आल्या होत्या. परदेशातून परतल्यावर एसीबीने शोध घेतला असता प्रतिभा यांच्या लक्झरी लाइफवर प्रकाश पडला. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू कार, तसंच महागडी बाइकही असल्याचं दिसून आलं आहे.

First published:

Tags: Crime, Police arrest