नवी दिल्ली, 02 मार्च: 2021-22 या चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने विविध आर्थिक बदल करायला सुरुवात केली आहे. यावर्षी अनेक गोष्टींच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. तर काही वस्तुंच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातील अनेक नागरिकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. अशात तुम्हाला जुनी नाणी (Rare coin) गोळा करण्याचा छंद असेल तर तुम्ही घरी बसून करोडपती बनू शकता. जर तुमच्याकडे खास प्रकारचं 1 रुपयाचं नाणं असेल तर तुम्ही त्या नाण्याचा लिलाव करून 10 करोड रुपयांपर्यंत पैसे कमावू शकता.
ब्रिटीशकालीन 1 रुपयाच्या नाण्याला मागणी
कोट्यावधी रुपयांची कमाई करून देणारं हे नाणं 1 रुपयाचं किरकोळ नाणं असू शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे ब्रिटीशकालीन एक रुपयांच नाणं असायला हवं. तेही 1885 या वर्षातलं. जर तुमच्याकडे 1885 वर्ष छापलेलं नाणं असेल तर तुम्ही त्या नाण्याचा ऑनलाईन लिलाव करू शकता. या नाण्याच्या ऑनलाइन लिलावातून तुम्ही 9 कोटी 99 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळवू शकता. तर मग चला जाणून घेवूया याचा लिलाव कुठे करायचा ते...
या वेबसाइट्सवर ऑनलाइन पद्धतीने नाण्याची विक्री करू शकता
https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html
https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/
http://www.indiancurrencies.com/
हे ही वाचा - या जुन्या नाण्यांसाठी लागतेय लाखोंची बोली; जर तुमच्याकडेही हे नाणं असेल तर मिळतील 25 लाख
तत्पूर्वी तुम्हाला तुमची प्रोफाइल तयार करावी लागेल
तुम्ही इंडियामार्टच्या वेब साइटवर या नाण्यांची विक्री करू शकता. याठिकाणी बरीच लोकं अशा विविध दुर्मिळ नाण्यांचा शोध घेत आहेत. तत्पूर्वी तुम्हाला वर नमूद केलेल्या वेब साइटवर जाऊन केवळ आपला लॉग इन आयडी तयार करावा लागेल. त्यानंतर संबंधित नाण्याचा फोटो अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्यांना तुमच्याकडील नाणं हवं आहे, ते तुमच्याशी संपर्क साधतील. अशाप्रकारे तुम्ही तुमच्याकडील दुर्मिळ नाण्याचा लिलाव करू शकता. याव्यतिरिक्त ओएलएक्स या वेब साइटवर जाऊन देखील तुम्ही या नाण्याची विक्री करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money