Home /News /money /

कर्जात अडकायचं नसेल तर आर्थिक नियोजन योग्य करा, 'या' गोष्टी लक्षात ठेवा

कर्जात अडकायचं नसेल तर आर्थिक नियोजन योग्य करा, 'या' गोष्टी लक्षात ठेवा

अशी मिळवा कर्जापासून मुक्तता

अशी मिळवा कर्जापासून मुक्तता

बचत करणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या उत्पन्नापैकी काहीच रक्कम बचत करत नसाल तर भविष्यात तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता. आपल्यासाठी इमर्जन्सी फंड राखून ठेवणे खूप महत्वाचे आहे.

    मुंबई, 8 जानेवारी : प्रत्येकालाच कधी ना कधी कोणत्यातरी आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी अगोदरच सतर्क राहणे आवश्यक आहे. काही खास गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन बिघडण्यापासून वाचवू शकता. क्रेडिट कार्ड पेमेंट (Credit Card Payment) जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे पेमेंट पूर्ण न करण्याऐवजी किमान पेमेंट (Minimum Payment) करत असाल तर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. तुम्ही क्रेडिट कार्ड बिलाच्या 90 टक्के रक्कम भरल्यास, तरी तुम्हाला पुढील बिलिंग सायकलमध्ये संपूर्ण रकमेवर व्याज द्यावे लागेल, केवळ 10 टक्के थकबाकीवर नाही. त्यामुळे एकाच वेळी बिल भरणे कधीही चांगले. आठवडाभरातील 'सुपर स्टॉक्स', अवघ्या पाच दिवसात 90 ते 70 टक्के रिटर्न्स, तुमच्याकडे आहे का 'हे' शेअर्स? बचत करणे आवश्यक (Savings) बचत करणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या उत्पन्नापैकी काहीच रक्कम बचत करत नसाल तर भविष्यात तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता. आपल्यासाठी इमर्जन्सी फंड राखून ठेवणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या उत्पन्नातील 10-20 टक्के बचत करण्याचा नेहमी प्रयत्न करा. तुमच्या उत्पन्नावर शून्य बचत असल्यास, तुम्हाला आर्थिक धोका उद्भवू शकतो. EMI कडे लक्ष द्या बरेचदा असे दिसून आले आहे की लोक लहान कर्ज घेतात, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नातील 50 टक्के रक्कम EMI भरण्यात जाते. याची विशेष काळजी घ्या, तुमच्या उत्पन्नाच्या फक्त 30 ते 40 टक्के कमी EMI मध्ये द्या. शॉपिंग किंवा इतर गोष्टींमध्ये तुमचे उत्पन्न वाया घालवू नका. तुम्ही EMI तुमचं उत्पन्न घालवल्यास बचत करू शकणार नाही. Multibagger stocks : 'या' पेनी स्टॉक्सवर यावर्षी नजर, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का? या गोष्टी लक्षात ठेवा 1. क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी, तुम्ही क्रेडिट कार्डमध्ये बिल पेमेंटसाठी ऑटो पे पर्याय इनेबल केला पाहिजे. 2. एका कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसऱ्या कर्जाचा सहारा घेऊ नका. 3. जर तुम्ही EMI घेतले असतील, तर ते प्रथम प्राधान्याने भरा.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Financial debt, Loan, Money

    पुढील बातम्या