जाहिरात
मराठी बातम्या / मनी / income tax भरताना अडचणी येत आहेत? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

income tax भरताना अडचणी येत आहेत? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

इन्कम टॅक्स रिटर्नबाबत टॅक्सपेअर्सच्या मनात अनेक प्रश्न असतात. आयकर विभाग हे प्रश्न सोडवण्याचा सतत प्रयत्न करत असतो.

इन्कम टॅक्स रिटर्नबाबत टॅक्सपेअर्सच्या मनात अनेक प्रश्न असतात. आयकर विभाग हे प्रश्न सोडवण्याचा सतत प्रयत्न करत असतो.

इन्कम टॅक्स रिटर्नबाबत टॅक्सपेअर्सच्या मनात अनेक प्रश्न असतात. आयकर विभाग हे प्रश्न सोडवण्याचा सतत प्रयत्न करत असतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर :   सरकारनं निश्चित केलेल्या एका ठराविक रकमेपेक्षा आपलं वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर इन्कम टॅक्स भरावा लागतो. इन्कम टॅक्स रिटर्नबाबत टॅक्सपेअर्सच्या मनात अनेक प्रश्न असतात. आयकर विभाग हे प्रश्न सोडवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. आपल्या टॅक्सपेअर्सच्या समस्या लक्षात घेऊन आयकर विभागाने रिटर्न भरण्यासंदर्भात काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न हा (ITR) हा एक प्रकारचा फॉर्म आहे. ज्यामध्ये टॅक्सपेअर आपल्या उत्पन्नाची आणि आर्थिक वर्षात भरलेल्या टॅक्सची माहिती देतो. उत्पन्नाचा प्रकार आणि स्थितीनुसार टॅक्स रिटर्न भरण्याचा फॉर्मदेखील वेगळा असतो. या ठिकाणी इन्कम टॅक्स रिटर्नबाबत काही अडचणी आणि त्यांचे उपाय दिलेले आहेत. प्रश्न : ‘SOMETHING WENT WRONG’ अशी एरर दिसत असेल तर काय करावं? उपाय: जर तुम्हालाही टॅक्स रिटर्न भरताना ही समस्या येत असेल, तर तुमचं प्रोफाइल पूर्णपणे अपडेट करा. त्यानंतर त्यात नवीन फायलिंग सुरू करा. याशिवाय, एरिया, शहर आणि लोकॅलिटीसह कॉन्टॅक्ट डिटेल्स भरा. त्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये ड्राफ्ट फाइलच्या मदतीने ITR भरण्याचा प्रयत्न करा. (आता दंड भरून पॅन-आधार कार्ड करावे लागेल लिंक; या मुदतीनंतर पॅन कार्ड थेट अवैध ठरणार) प्रश्न : टॅक्स फाइल केल्यानंतर पुन्हा लॉग इन केल्यास कर दायित्वामध्ये मोठा फरक दिसत आहे. मात्र, वैयक्तिक तपशीलांव्यतिरिक्त दुसरे काहीही बदल केले जाऊ शकत नाहीत. उपाय: अशा परिस्थितीत ब्राउझरच्या सर्व कुकीज आणि कॅशे मेमरी क्लिन करावी लागेल. त्यानंतर तुम्ही ऑनलाइन मोडमध्ये नवीन टॅक्स फायलिंग सुरू करू शकता. प्रश्न : ई-व्हेरिफाय करण्यात अडचण, सबमिट बटणही काम करत नाही. उपाय: या अडचणीसाठीदेखील तुम्हाला तुमच्या ब्राउझरमधून सर्व कुकीज आणि कॅशे मेमरी क्लिन करावी लागेल. त्यानंतर तुमची अडचण दूर होईल. (LIC गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! कंपनी डिव्हिडंट अन् बोनस शेअर वाटण्याच्या तयारीत, वाचा डिटेल्स) प्रश्न  : TDS-1 आणि डिक्लेअर्ड ग्रॉस सॅलरीमध्ये फरक असल्यास काय करावं? उपाय: जर तुमच्या पगारापेक्षा टीडीएस जास्त असेल तर तुम्हाला पगार आणि कापलेला टीडीएसची अचूक माहिती द्यावी लागेल. त्यानंतर आयटीआर भरावा लागेल. प्रश्न  : युटिलिटी एररसाठी डेव्हलपरशी संपर्क साधण्याचा मेसेज दिसल्यास काय करावे? उपाय: यासाठी तुम्हाला तुमचं प्रोफाईल पूर्णपणे अपडेट करावं लागेल. याशिवाय, एरिया, शहर आणि लोकॅलिटीसह कॉन्टॅक्ट डिटेल्स भरून कन्फर्म करा. त्यानंतर, ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये ड्राफ्ट फाइलच्या मदतीने ITR भरण्याचा प्रयत्न करा. प्रश्न : जमा कर आणि कर रिटर्नचा पर्याय उपलब्ध नसल्यास काय करावं? उपाय: यासाठी, कुकीज आणि कॅशे मेमरी क्लिन करून ऑनलाइन मोडमध्ये नवीन फायलिंग सुरू करावे लागेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात