मराठी बातम्या /बातम्या /मनी /जुनी नाणी-नोटा असतील तर बक्कळ पैसे कमवण्याची संधी; कशी-कुठे विकायची पहा

जुनी नाणी-नोटा असतील तर बक्कळ पैसे कमवण्याची संधी; कशी-कुठे विकायची पहा

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

जुनी नाणी आणि चलनी नोटांची ऑनलाइन विक्री करून तुम्ही एका रात्रीत श्रीमंत बनू शकता. सध्या 1 आणि 2 रुपयांची जुनी नाणी आणि 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपयांच्या जुन्या नोटांना बाजारात चांगली मागणी आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 मार्च : बऱ्याच जणांना जुनी नाणी (Old Coins) किंवा जुन्या नोटा (Old currency note) जमा करण्याचा, जपून ठेवण्याचा छंद असतो. तुम्हीही जुनी नाणी किंवा नोटा जपून ठेवल्या असतील तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. जुनी नाणी आणि चलनी नोटांची ऑनलाइन विक्री करून तुम्ही एका रात्रीत श्रीमंत बनू शकता. सध्या 1 आणि 2 रुपयांची जुनी नाणी आणि 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपयांच्या जुन्या नोटांना बाजारात चांगली मागणी आहे. आपल्याकडेही अशी नाणी किंवा नोटा असतील तर लाखो रुपये कमावण्याची नामी संधी आहे. सध्या Numismatists म्हणजे नाणी साठवणारे आणि नोटाफिलिस्ट (कागदी नोटांचा अभ्यास किंवा संग्रह करणाऱ्या व्यक्ती) दुर्मीळ नाणी आणि नोटांच्या शोधात आहेत. तुमच्याकडे अशी नाणी किंवा नोटांचा संग्रह असल्यास ती विकून हवी चांगला मोबदला मिळवू शकता. चला तर मग, या नाण्यांविषयी आणि नोटांच्या विक्रीबद्दल अधिक जाणून घेऊ या.

प्रामुख्याने 'या' नाण्यांना आणि नोटांना आहे मागणी

- माता वैष्णोदेवीची प्रतिमा असलेली, अशी 5 आणि 10 रुपयांची नाणी तुमच्याकडे असतील, तर या नाण्यांना बाजारात मोठी मागणी आहे. ज्यांच्याकडे अशी नाणी आहेत, त्यांच्याकडून खरेदी करण्यासाठी लोक लाखो रुपये देण्यास तयार आहेत.

- तुमच्याकडे 1 रुपयाची जुनी नोट असेल तर तुम्ही 45 हजार रुपये कमावू शकता. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एक रुपयाच्या नोटांचं बंडल 45 हजार रुपयांना विकलं जात आहे. 1957 सालचे गव्हर्नर एच. एम. पटेल यांची सही असलेल्या या नोटा असणं गरजेचं आहे. तसंच या नोटेचा अनुक्रमांक 123456 असणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर ओएनजीसीच्या (ONGC) 5 रुपये आणि 10 रुपयांच्या स्मारक नाण्यांसाठी 200 रुपये मिळत आहेत.

- तुम्ही शंभर रुपयांच्या नोटेसाठी 1,999 रुपये मिळवू शकता; मात्र ती नोट 000786 च्या असामान्य संख्यात्मक सीरिजची असावी. तसंच त्या नोटेवर आरबीआयचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव (RBI governor D Subbarao) यांची सही असावी, अशी अपेक्षा खरेदीदारांनी व्यक्त केली आहे.

हे वाचा - Car Loan Tips : तुम्ही कार लोन घेण्याचा विचार करताय, जाणून घ्या हप्त्याचं गणित

- 1943 मध्ये जारी केलेली दहा रुपयांची नोट (ब्रिटिशांच्या काळातील) कॉइनबझारवर (coin bazaar) विकून तुम्ही पैसे मिळवू शकता. या नोटेवर आरबीआय गव्हर्नर सीडी देशमुख यांची सही आहे. तसंच या नोटेवर एका बाजूला अशोक स्तंभ आणि दुसर्‍या बाजूला एका जहाजाचा फोटो आहे. नोटेच्या मागच्या बाजूला दोन्ही टोकांवर "दहा रुपये" असं इंग्रजीत लिहिलेलं आहे. या दुर्मीळ नोटेच्या बदल्यात तुम्ही 25,000 रुपयांपर्यंत मोबदला मिळवू शकता.

- तुमच्याकडे 1862मधली क्वीन व्हिक्टोरियाची प्रतिमा असलेली नाणी असतील, तर त्यासाठी क्विकरवर (Quikr) खरेदीदार 1.5 लाख रुपये देण्यास तयार आहेत. 1862 मधलं एक रुपयाचं हे चांदीचं नाणं दुर्मीळ नाण्यांच्या प्रकारात मोडतं.

हे वाचा - पैशांनी पैसा कमवायचा आहे ना? मग पगार येताच करा ही कामं

विक्री कुठे आणि कशी करायची?

अशा जुन्या नोटा आणि नाणी कॉइनबझार (CoinBazar), इंडियामार्ट (Indiamart) आणि क्विकर (Quikr) अशा बर्‍याच वेबसाइटवर विकली जाऊ शकतात. CoinBazaar.com वर विक्री करण्यासाठी तुम्ही प्रथम तिथे नोंदणी करणं आवश्यक आहे. स्वतःची माहिती भरल्यानंतर तुम्ही विक्री करू इच्छित असलेली नाणी किंवा नोटांचा तपशील द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या किमतीबद्दल माहिती द्यावी लागेल. यानंतर, इच्छुक खरेदीदार तुमच्याशी थेट संपर्क साधतील. Coinbazaar ही वेबसाइट 23 मार्च 2015 रोजी सुरू झाली आणि 2020मध्ये ती एक खासगी लिमिटेड कंपनी बनली आहे. यावरून लोकांचा प्रतिसाद लक्षात येऊ शकतो.

First published:
top videos

    Tags: Money, Money matters