तुम्ही जर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. इथे तुम्हाला अगदी सोप्या शब्दात कार लोनच्या हप्ताबाबत सांगणार आहोत.
कार लोन घेताना आपण काय विचार करतो की 5 वर्ष किंवा 3 वर्ष लोनचा हप्ता ठेवूया. त्यामुळे आपल्याला हप्ता कमी बसेल. मात्र इथेच आपण चुकतो.
कारसाठी लोनचा हप्ता जरी कमी बसला तरी तुमच्या खिशातले पैसे मात्र जास्तचं जातात. कसे ते अगदी सोप्या उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया.
समजा तुम्ही ९.५ टक्के व्याजाने 3 लाख रुपयांचं कारलोन घेतलं. हे लोन तुम्ही जर 12 महिन्यात फेडलं तर तुम्हाला महिन्याचा EMI २६ हजार ३०५ बसेल. तुम्ही 12 महिन्यात 3 लाख 15 हजार रुपयांची रक्कम भराल. तुम्ही 15 लाख रुपये जास्त भरणार आहात.
हाच EMI तुम्ही 24 महिन्यांसाठी जर तुम्ही EMI केलात तर 13 लाख 774 हजार बसतो पण इंटरेस्ट रेट 30 हजार 500 रुपये जास्त वाढतो. म्हणजे 12 महिने वाढल्याने तुम्ही दुप्पट 15 आणि 15 असा 30 हजार जास्त इंटरेस्ट भरणार. जेवढी वर्ष वाढतील तेवढा दुप्पट हा रेट वाढत जाणार.
याच दरम्यान जर चुकून बँकेनं व्याजदर वाढवलं तर पुन्हा तुमच्या लोनचा इंटरेस्ट रेट वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही हे EMI च्या हप्त्याचं गणित समजून घ्यायला हवं. याशिवाय प्रोसेसिंग फी आणि इतर खर्च लागणार तो वेगळा आहे. त्यामुळे त्याचाही विचार करायला हवा.