मराठी बातम्या /बातम्या /मनी /

या बँकेच्या ग्राहकांना झटका! बचत खात्यावरील व्याज दरात 2% कपात, आजपासून नवे दर लागू

या बँकेच्या ग्राहकांना झटका! बचत खात्यावरील व्याज दरात 2% कपात, आजपासून नवे दर लागू

भारतातील कोरोना संकटाच्या (Corona in India) पार्श्वभूमीवर आयडीएफसी फर्स्ट बँकेने (IDFC first Bank) बचत खात्यावर व्याज दर कमी करण्याची घोषणा केली आहे. सध्या आयडीएफसी बँक ही एकमेव बँक आहे जी 1 लाखाहूनही कमी ठेवींवरही 6 टक्के व्याज देते.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 01 मे: भारतातील कोरोना संकटाच्या (Corona in India) पार्श्वभूमीवर आयडीएफसी फर्स्ट बँकेने (IDFC first Bank) बचत खात्यावर व्याज दर कमी करण्याची घोषणा केली आहे. सध्या आयडीएफसी बँक ही एकमेव बँक आहे जी 1 लाखाहूनही कमी ठेवींवरही 6 टक्के व्याज देते. आयडीएफसी बँकेने बचत खात्यावरील व्याज (Saving Interest Rates) दर 1 मेपासून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, आजपासून नवीन दर लागू होतील.

जाणून घ्या व्याज दरात किती कपात?

ज्या लोकांच्या खात्यांमध्ये 1 लाखाहून कमी रक्कम शिल्लक आहे, त्यांना 4 टक्के व्याजदर मिळेल. ज्या ग्राहकांच्या खात्यांमध्ये 1 लाख ते 10 लाखांपर्यंतची रक्कम आहे, त्यांना 4.5 टक्के व्याजदर मिळेल. तर, ज्या खात्यांतील शिल्लक रक्कम 10 लाखांपेक्षा जास्त असेल, त्यांना सर्वाधिक 5 टक्के व्याज दिले जाईल.

हे वाचा-आजपासून बदलणार 5 नियम, बँकेपासून LPG पर्यंत या नियमांचा तुमच्यावर थेट परिणाम

काय आहेत इतर बँकांचे व्याज दर?

सध्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ठेवींवर 3 ते 3.5% टक्के व्याज दर देत आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय (SBI) 2.7 टक्क्यांचा व्याज दर देत आहे. बर्‍याच खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सध्या बचतींवर 3 ते 3.5 टक्के परतावा देत आहेत. खात्यावर एक लाखांपर्यंतची रक्कम असल्यास फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (Fincare small finance bank) 5%, आरबीएल बँक (RBL Bank) 4.75%, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 4%, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 4%, इक्विटास स्मॉल फायनान्स 3.5 % आणि बंधन बँक 3% व्याज दर देत आहे. एक लाखाहून अधिकच्या ठेवींसाठी स्मॉल इक्विटास आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स प्रत्येकी 7 टक्के व्याज दर देत आहे.

हे वाचा - PM Kisan: शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000, असं करा रजिस्ट्रेशन

इंडसइंड बँकेनेही कमी केले एफडीवरील व्याज दर

दुसरीकडे, खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने (Indusind Bank) आपल्या ठेवींवरील व्याजदरात बदल केले आहेत. इंडसइंड बँक आता 7 ते 30 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 2.75% व्याज देणार आहे. तर, 31 ते 45 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 3%, 46 ते 60 दिवसांच्या मुदतीवर 3.50% आणि 61 ते 90 दिवसांच्या मुदतीनंतर 3.75% व्याजदर मिळेल. नवीन व्याज दर 26 एप्रिलपासून लागू झाले आहेत.

First published:

Tags: Personal banking, Saving bank account, Savings and investments