मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Kisan: शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4 हजार, अगदी सोप्या पद्धतीनं असं करा रजिस्ट्रेशन

PM Kisan: शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4 हजार, अगदी सोप्या पद्धतीनं असं करा रजिस्ट्रेशन

पंतप्रधान किसान (PM Kisan) सन्मान निधीच्या नियमांनुसार आपण जूनमध्ये अर्ज केल्यास आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्यास जून किंवा जुलैमध्ये तुम्हाला 2000 रुपये मिळतील. सध्या, देशातील 11 कोटीहून अधिक लोक पंतप्रधान किसानच्या एप्रिल ते जुलैच्या पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 01 मे : तुम्ही अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi scheme) नोंदणी केली नसेल तर 30 जूनआधी कोणत्याही परिस्थितीमध्ये नोंदणी करुन घ्या. याचा फायदा असा होईल, की या वर्षाचे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील. पंतप्रधान किसान (PM Kisan) सन्मान निधीच्या नियमांनुसार आपण जूनमध्ये अर्ज केल्यास आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्यास जून किंवा जुलैमध्ये तुम्हाला 2000 रुपये मिळतील. सध्या, देशातील 11 कोटीहून अधिक लोक पंतप्रधान किसानच्या एप्रिल ते जुलैच्या पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

ही कागदपत्रे द्यावी लागतील -

हप्ता घेण्यासाठी आपल्याकडे बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. आपले बँक खाते आधारशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा करण्याबाबत अनेक बदल झाले. जेव्हा पहिल्यांदा ही रक्कम जमा झाली तेव्हा आधार नंबर गरजेचा नव्हता. दुसऱ्या हप्त्यापासून आधार नंबर अनिवार्य केला देला. मात्र, आसाम मेघालय, जम्मू आणि काश्मीरला यातून सूट देण्यात आली आहे.

आपली कागदपत्रं आपण pmkisan.gov.in या वेबसाईटवर अपलोड करू शकता. यानंतर तुम्ही फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर जा आणि तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं असल्यास त्यासाठी तुम्ही एडिट आधार डिटेलच्या (Edit Aadhaar Detail) पर्यायावर क्लिक करुन अपडेट करू शकता.

लिस्टमध्ये असं तपासा आपलं नाव -

१. सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in वर भेट द्यावी लागेल.

२. याच्या होमपेजवरच आपल्याला Farmers Corner हा पर्याय दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये तुम्हाला Beneficiaries List या पर्यायावर क्लिक करावं लागेल.

4. यानंतर तुम्हाला ड्रॉप डाउन लिस्टमध्ये राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडावं लागेल.

5. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावं लागेल. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण लिस्ट समोर येईल. यामध्ये आपण आपले नाव शोधू शकता.

पीएम किसान योजनेंतर्गत दरवर्षी मोदी सरकार शेतकऱ्यांना 6000 रुपये 2 हजाराच्या तीन हप्त्यांमध्ये देतं. यानुसार, प्रत्येक वर्षीचा पहिला हप्ता एक एप्रिल ते 31 जुलै, दुसरा एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा १ डिसेंबर ते 31 मार्चच्या दरम्यान जमा होतो.

First published:

Tags: Farmer, Money, PM Kisan