जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पती त्याचा पगार सांगत नसेल तर बायको वापरू शकते का RTI?

पती त्याचा पगार सांगत नसेल तर बायको वापरू शकते का RTI?

पगाराबद्दल चर्चा करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

पगाराबद्दल चर्चा करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

पतीचा पगार जाणून घेण्याचा पत्नीला अधिकार? कोणत्या मार्गाने काढता येते माहिती

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : वय आणि पगार कधी विचारू नये असं म्हणतात पण तुमचा खरा पगार हा तुमच्या बायकोला किंवा नवऱ्याला माहिती असायला हवा का? पगाराबाबत विशेष कोणी बोलताना दिसत नाही. लग्नात नवऱ्याची सॅलरी ही बायकोला माहिती असायला हवी का? जर ती माहिती नसेल किंवा खोटी माहिती दिली तर बायको RTI चा वापर करून खरी माहिती मिळवू शकते का? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. एक नुकताच असा प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये एका महिलेनं RTI चा वापर करून पतीच्या सॅलरीविषयी माहिती मागितली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) आयकर विभागाला महिलेला तिच्या पतीच्या निव्वळ करपात्र उत्पन्न / एकूण उत्पन्नाविषयी 15 दिवसांच्या आत माहिती देण्याचे निर्देश दिले. कोणत्याही पत्नीला तिच्या पतीच्या पगाराची माहिती आरटीआयद्वारे मिळू शकते का? सुरुवातीला स्थानिक आयकर विभागातील सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफसरने त्यांना माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली. पगाराची माहिती देण्यासाठी पतीची सहमती नसल्याने त्यांनी विरोध केला. मात्र महिलेला पगाराची माहिती हवी होती. तिने FAA जवळ यासंदर्भात अर्ज लिहिला. FAA अपीलीय अधिकारी हा सार्वजनिक माहिती अधिकार्‍यांपेक्षा वरचा अधिकारी असतो. पण FAA ने CPIO चा निर्णय कायम ठेवला. महिलेने पुन्हा सीआयसीमध्ये अपील दाखल केलं. CIC ने मागच्या काही केसमधील संदर्भ पडताळले. एका केसमध्ये पत्नीला पतीची सॅलरी माहिती असणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं तो तिचा अधिकार असल्याचं या केसमध्ये म्हटलं होतं. या प्रकरणात, CIC ने CPIO ला पतीचे निव्वळ करपात्र उत्पन्न / एकूण उत्पन्नाची माहिती 15 दिवसांच्या आत पत्नीला देण्याचे निर्देश दिले. मालमत्ता, लायबिलिटीज, ITR, गुंतवणुकीचे तपशील, कर्ज इत्यादी वैयक्तिक तपशीलांमध्ये येतात. अशी वैयक्तिक माहिती आरटीआयच्या कलम 8 (1)(जे) अंतर्गत सुरक्षित ठेवली पाहिजे. मात्र, सुभाषचंद्र अग्रवाल यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जनहिताची अट पूर्ण केल्यास परवानगी दिली जाऊ शकते, असे म्हटले होते.

News18लोकमत
News18लोकमत

खरं तर RTI अंतर्गत खासगी माहिती काढता येत नाही. सरकारी किंवा निमसरकारशी संबंधित माहिती तुम्हाला काढता येते. त्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागतो. ती माहिती कशासाठी हवी याचेही तपशील तुम्हाला देणं बंधनकारक असतं. त्यामुळे RTI जरी महिलांना पतीचा पगार किती हे काढण्यासाठी वापरता आला नाही तरी इतर कायदेशीर मार्गाचा वापर करून त्या माहिती मिळवू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: RTI , Tax
  • First Published :
जाहिरात
जाहिरात