Home /News /money /

Home Loan व्याजदर वाढले, तरीही कमी व्याजदरात मिळवू शकता लोन, काय करावं लागेल?

Home Loan व्याजदर वाढले, तरीही कमी व्याजदरात मिळवू शकता लोन, काय करावं लागेल?

Home Loan: गृहकर्जाची रक्कम जितकी जास्त असेल तितका व्याजदर जास्त असेल. जर तुम्ही 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेतले तर तुम्हाला सर्वात कमी व्याज द्यावे लागेल.

    मुंबई, 22 जून : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Repo Rate) रेपो दरात वाढ केल्यानंतर आता बँकांनीही गृहकर्ज (Home Loan) महाग केले आहेत. रिझर्व्ह बँकेने दोन वेळा रेपो दरात 90 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यामुळेच मे पूर्वी गृहकर्जाचा कमाल दर 6.80 टक्के होता, तो आता वार्षिक 7.70 टक्के झाला आहे. आता आधीच चालू असलेले कर्ज आणि नवीन कर्ज अशा दोन्ही परिस्थितीत व्याज वाढले आहे. तुम्हालाही गृहकर्ज घ्यायचे असल्यास किंवा तुम्ही तुमच्या चालू असलेल्या गृहकर्जावर कमी व्याज वाचवू शकता. नवीन कर्ज घेताना, तुम्हाला व्याजदरात काही सूट सहज मिळू शकते कारण अनेक बँका सतत ऑफर देत असतात. मात्र या ऑफर्समध्ये काही अटी असतात. तुम्ही या अटी पूर्ण केल्यास बँक तुम्हाला इतरांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देईल. रिफायनान्सिंग सवलतींचा लाभ घ्या नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका व्याजदरात सवलत देतात. तुमचा सध्याचा गृहकर्ज दर खूप जास्त असल्यास तुम्ही ते रिफानान्सिंगद्वारे कमी करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला बँकांकडून यासंदर्भात दिल्या जाणाऱ्या सवलतींची माहिती घ्यावी लागेल. रिफानान्सिंग बाबत इतर बँकांशी बोलून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की बँका रिफानान्सिंग बाबतीत सर्व ग्राहकांना सवलत देत नाहीत. ही सूट काही अटींच्या अधीन आहे. Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी लाईफ कशी वाढवावी? फॉलो करा 'या' टिप्स क्रेडिट स्कोअर सुधारा स्वस्त कर्ज मिळवण्यात क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असणे महत्त्वाचे आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर अजूनही कमी असेल, तर तुम्ही एकदा गृहकर्ज घेणे पुढे ढकला आणि आधी तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारा. यामुळे तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळण्यास मदत होईल. कोणत्याही प्रकारचे कर्ज न मिळाल्याने तुम्ही तुमचा क्रेडिट हिस्ट्री तयार केली नसेल, तर तुम्ही प्रथम क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्ज घेऊन क्रेडिट स्कोअर विकसित करू शकता. जेव्हा तुमचा क्रेडिट स्कोअर 750 च्या वर असेल, तेव्हा तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करू शकता. महिलांना सवलत मिळते अनेक बँका महिलांना कमी व्याजदरात गृहकर्ज देतात. गृहकर्ज घेताना या विषयावरही संशोधन करा. पुरुषही कुटुंबातील महिलांसोबत संयुक्त कर्ज घेऊ शकतात. पती-पत्नी, आई-मुलगा आणि वडील-मुलगीही संयुक्त गृहकर्ज घेऊ शकतात. कमी व्याजदरात गृहकर्ज मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. अनेक राज्ये महिलेच्या नावावर घर किंवा जमीन खरेदी करण्यासाठी नोंदणी शुल्कात सूट देतात. खिशाला लागणार कात्री? घरगुती गॅसपासून मालमत्तेपर्यंत येत्या 10 दिवसात बदलणार 'हे' 5 नियम कर्जाची रक्कम कमी ठेवा गृहकर्जाची रक्कम जितकी जास्त असेल तितका व्याजदर जास्त असेल. जर तुम्ही 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज घेतले तर तुम्हाला सर्वात कमी व्याज द्यावे लागेल. यापेक्षा जास्त कर्ज घेणार असल्यास त्या पद्धतीने व्याजदर वाढतो. त्यामुळे गृहकर्ज घेताना गृहकर्जाची रक्कम अत्यंत काळजीपूर्वक ठरवावी. जर तुम्ही रिफायनान्स करत असाल तर तुम्हाला छोट्या कर्जावर चांगला व्याजदर मिळू शकेल. प्री अप्रुव्ह ऑफरबद्दल जाणून घ्या तुम्ही नवीन कर्ज घेत असाल, तर आधी तुमच्या बँकेने तुमच्यासाठी तयार केलेल्या प्री अप्रुव्ह ऑफर तपासा. प्रत्येक बँक आपल्या सर्वोत्कृष्ट ग्राहकांना इतर ग्राहकांच्या तुलनेत काही सवलतीत गृहकर्ज व्याजदर देते. तसेच, तुमचे गृहकर्ज चालू असल्यास, तुमचे कर्ज रेपो रेट, MCLR किंवा बेस रेटच्या तुलनेत बेंचमार्क आहे की नाही ते शोधा.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Home Loan, Money, Repo rate

    पुढील बातम्या