मुंबई: एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड आवश्यक आहे. पण आजच्या डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या युगात तुम्ही डेबिट कार्डशिवायही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता. हो तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. यासाठी फक्त तुमच्या जवळ तुमचा स्मार्टफोन हवा आहे. तुम्हाला एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डची गरज नाही. विशेष म्हणजे ही बँकिंग सेवा अनेक दिवसांपासून सुरू आहे. अनेक बँका या पूर्वीच त्यांच्या ग्राहकांना एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा देत होत्या. पण आता रिझर्व्ह बँकेनं या सुविधेची व्याप्ती आणखी वाढवली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी यूपीआय (UPI) म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस वापरला जाईल. आरबीआयनं बँकांना कार्ड न वापरता पैसे काढण्याची सुविधा देण्याची परवानगी दिली आहे. चला तर, आज आपण कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढले जाऊ शकतात, याबाबत जाणून घेऊया. डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये भीम, पेटीएम, गुगल पे, फोन पे इत्यादीसारखे कोणतेही यूपीआय सक्षम अॅप असलं पाहिजे. या अॅप्सद्वारे तुम्ही पैसे काढू शकाल.
New Year ला मिळालेल्या गिफ्टवर किती लागणार TAX? वाचा नियमअसे काढा कार्डशिवाय पैसे पैसे काढण्यासाठी प्रथम एटीएम सेंटरवर जा, आणि एटीएमवर कार्डशिवाय पैसे काढण्याचा ऑप्शन निवडा. तुम्हाला यूपीआयद्वारे ओळख सिद्ध करण्याचा ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरील यूपीआय अॅप ओपन करा, व तुमच्या समोर दिसणारा क्युआर कोड स्कॅन करा. तुमचे यूपीआयद्वारे ऑथेंटिकेशन केलं जाईल, व त्यानंतर तुम्ही पैसे काढू शकाल. पुढील प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असेल. तुम्हाला हवी असलेली रक्कम टाका, आणि तुमचे पैसे काढा. बँकांनाही मिळणार दिलासा रिझर्व्ह बँक लवकरच एनपीसीआय, एटीएम नेटवर्क आणि बँकांना डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देण्यासाठी स्वतंत्र सूचना जारी करण्याची शक्यता आहे. या सुविधेसाठी यूपीआयचा वापर केला जाईल. यूपीआयद्वारे ग्राहकांची ओळख पटवली जाईल, आणि असे व्यवहार एटीएमनेटवर्कद्वारे पूर्ण केले जातील. या सुविधेमुळे बँकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
तुम्हाला मिळू शकतं का एक टक्के व्याजाने कर्ज, नेमकं कसं ओळखायचं?फायदेशीर सुविधा कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा अतिशय फायदेशीर असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं आहे. ‘कार्डशिवाय पैसे काढण्याच्या सुविधेमुळे कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग यांसारख्या फसवणुकीला आळा बसेल,’ असंही ते म्हणाले. याशिवाय तुम्हाला एटीएम कार्ड सोबत ठेवण्याचीही गरज भासणार नाही. पण तुम्हाला यासाठी स्मार्टफोन सोबत ठेवावा लागेल.