असा सुरू करा रेस्टॉरंटचा व्यवसाय; महिन्याला होईल मोठी कमाई, जाणून घ्या प्रोसेस

असा सुरू करा रेस्टॉरंटचा व्यवसाय; महिन्याला होईल मोठी कमाई, जाणून घ्या प्रोसेस

तुम्ही एखादा व्यवसाय (Business) करण्याचा विचार करत असाल, तर रेस्टॉरंटचा (Restaurant) व्यवसाय करून तुम्ही महिन्याला लाखभर रुपये कमावू शकता. अलीकडच्या काळात ऑनलाइन फूड डिलिव्हरीची (Online Food Delivery) मागणी सातत्यानं वाढत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 एप्रिल : सध्याच्या काळात तुम्ही एखादा व्यवसाय (Business) करण्याचा विचार करत असाल, तर रेस्टॉरंटचा (Restaurant) व्यवसाय करून तुम्ही महिन्याला लाखभर रुपये कमावू शकता. अलीकडच्या काळात ऑनलाइन फूड डिलिव्हरीची (Online Food Delivery) मागणी सातत्यानं वाढत आहे. सध्या कोरोना साथीच्या काळातही ऑनलाइन फूड डिलिव्हरीची मागणी टिकून आहे. त्यामुळे तुम्ही या व्यवसायात चांगली कमाई करू शकाल. या व्यवसायाच्या वाढीचा वेगही मोठा असतो त्यामुळे एकदा बिझनेस सेट झाला की प्रगती निश्चित असते.

या व्यवसायात उतरायचे असेल, तर आधी आपल्याला कोणत्या प्रकारचं रेस्टॉरंट सुरू करायचं आहे, हे नक्की करा. म्हणजे शाकाहारी (Veg), मांसाहारी (Non Veg), फास्ट फूड (Fast food) की सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ देणारे रेस्टॉरंट सुरू करायचं आहे, हे ठरवा किंवा एखाद्या विशिष्ट संकल्पनेवर आधारीत (Theme Based) रेस्टॉरंटही तुम्ही सुरू करू शकता.

कोणत्या गोष्टींची आवश्यकता -

एक चांगलं रेस्टॉरंट उघडण्यासाठी किमान 7 ते 12 लाख रुपयांची गरज असते. स्वतःची जागा असेल, तर हा खर्च आणखी कमी होऊ शकतो. यामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक करावी लागते ती जागेत. स्वतःची जागा नसेल आणि स्वमालकीची जागा घेणं परवडत नसेल, तर भाडेतत्वावर जागा घेऊनही हा व्यवसाय सुरू करता येतो. यासाठी किमान 700 ते 1500 चौरस फूट जागेची गरज आहे. जागा (Place) आणि भांडवलाची (Investment) सोय झाल्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे लायसन्स अर्थात व्यवसायासाठीचा परवाना.

रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी तुम्हाला अन्न प्रशासन (Food Safety) विभागाकडून अन्न सुरक्षा परवाना आणि आरोग्य विभागाकडून (Health Department0 किंवा नगर पालिकेकडून आरोग्य परवाना घेणं अत्यावश्यक आहे. रेस्टॉरंटबरोबर बार सुरू करायचा असेल तर याचा परवाना जिल्हाधिकारयांकडून घेणं आवश्यक आहे.

(वाचा - ATM मधून कॅश काढताना फाटलेल्या नोटा आल्यास काय कराल;जाणून घ्या महत्त्वाची माहिती)

मार्केटिंग महत्त्वाचं -

कोणत्याही व्यवसायाचं यश हे त्याच्या मार्केटिंगवर (Marketing) अवलंबून असतं. रेस्टॉरंट सुरू करण्याआधी आणि नंतर तुम्ही चांगल्या प्रकारे मार्केटिंग केलं तर आपला व्यवसाय चांगला वाढू शकतो. यासाठी प्रसार माध्यमांमध्ये जाहिराती देणं, सोशल साईट्सवर जाहिराती, पोस्टर्स, बॅनर्स लावणं याचा वापर करता येईल.

कर्मचारी वर्गाचा पगार -

रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा (Staff) पगार (Salary) तुम्हाला सुरुवातीला स्वतःच्या खिशातून द्यावा लागेल. सुरुवातीला कमी कर्मचाऱ्यांच्या आधारे काम करू शकता. नंतर व्यवसाय वाढेल तसे गरजेनुसार कर्मचारी वाढवता येतील.

(वाचा - फक्त एकदाच पैसे भरा, आयुष्यभर मिळवा पेन्शन; तुमच्यासाठी नवा टर्म इन्शुरन्स प्लॅन)

याशिवाय रेस्टॉरंटसाठी लागणारी उपकरणं, भांडी, क्रोकरी याची खरेदी करताना विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. यासाठी एखाद्या तज्ज्ञाची मदत घेणं उपयुक्त ठरेल. आपल्या रेस्टॉरंटमधील मेन्यू काय आहे यावर ही खरेदी आधारीत असते.  एखाद्या वेंडरशी संपर्क साधल्यास तो तुमच्या गरजेनुसार हव्या त्या वस्तू पाठवू शकतो.

सुरुवातीला संघर्ष -

सगळ्याच व्यवसायाप्रमाणे या व्यवसायातही सुरुवातीला संघर्ष करावा लागतोच. सुरुवातीच्या काळात लगेच नफा होत नाही. त्यासाठी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या तयारी ठेवणं आवश्यक आहे.

First published: April 5, 2021, 7:31 PM IST

ताज्या बातम्या