मराठी बातम्या /बातम्या /मनी /वाढलेल्या वीज बिलाने बजेट बिघडलंय? 'या' सोप्या टिप्स फॉल करा आणि हमखास वीजबिल कमी करा

वाढलेल्या वीज बिलाने बजेट बिघडलंय? 'या' सोप्या टिप्स फॉल करा आणि हमखास वीजबिल कमी करा

उन्हाळ्यात बहुतेकांना वीज बिलाची चिंता असते. जर तुम्हीही वाढलेल्या वीज बिलामुळे (Electricity Bill) चिंतेत असाल तर आम्ही 5 सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही वीज बिल कमी करू शकता.

उन्हाळ्यात बहुतेकांना वीज बिलाची चिंता असते. जर तुम्हीही वाढलेल्या वीज बिलामुळे (Electricity Bill) चिंतेत असाल तर आम्ही 5 सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही वीज बिल कमी करू शकता.

उन्हाळ्यात बहुतेकांना वीज बिलाची चिंता असते. जर तुम्हीही वाढलेल्या वीज बिलामुळे (Electricity Bill) चिंतेत असाल तर आम्ही 5 सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही वीज बिल कमी करू शकता.

मुंबई, 21 एप्रिल : महागाईने (Inflation) त्रस्त झालेला सामान्य माणूस कुठे पेशांची बचत होईल का याच्या विचारात असतो. त्या उन्हाळ्यात विजेचा (Electricity Uses) वापर वाढल्याने बिलही वाढलं आहे. उन्हाळ्यात पंखे, एसी, फ्रीज यांसारख्या वीज वापरणाऱ्या उपकरणांचा वापर वाढतो आणि त्यामुळे वीज बिल (Electricity Bill) अनेक पटींनी वाढते. उन्हाळ्यात (Summer Season) बहुतेकांना वीज बिलाची चिंता असते. जर तुम्हीही वाढलेल्या वीज बिलामुळे चिंतेत असाल तर आम्ही 5 सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही वीज बिल कमी करू शकता.

5 स्टार रेटिंगसह AC खरेदी करा

एअर कंडिशनर चालवताना विजेचा खर्च सर्वात जास्त असतो. अशा परिस्थितीत त्याचे योग्य व्यवस्थापन केले तर विजेची बचत होऊ शकते. एसी चालवण्यापूर्वी, त्याची सर्व्हिस करून घ्या आणि फिल्टर व्यवस्थित स्वच्छ करा किंवा बदला. घरात 7 किंवा 8 वर्षे जुना एसी असेल तर तो बदला. इन्व्हर्टरसह एसी वीज बिल वाचवण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय बीईई 5 स्टार रेटिंग असलेले एसी वापरा.

तुमच्या 'ड्रीम होम'च्या निर्मितीचा खर्च वाढणार, एप्रिल महिन्यात सिमेंटच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता

सोलार पॅनेल पर्याय

वीज बिल वाचवण्यासाठी सोलर पॅनलचा पर्याय सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅनेल लावू शकता. ही एक-वेळची गुंतवणूक आहे जी दीर्घकाळात तुमची बिले कमी करण्यास मदत करेल.

CFL च्या पाचपट वीज वाचवते

बल्ब आणि ट्यूबलाइटच्या तुलनेत सीएफएल पाचपट विजेची बचत करते, त्यामुळे सीएफएल वापरा. कोणत्याही खोलीत विजेची गरज नसल्यास ती बंद करा.

ऑनलाईन व्यवहार करताना 'या' टिप्स लक्षात ठेवा, तुमचे बँकेतील पैसे राहतील सुरक्षित

छत आणि टेबल फॅन वापरा

एसी पेक्षा सीलिंग आणि टेबल फॅन वापरा. यामुळे तुमचा वीज वापरही कमी होऊ शकतो.

हाय रेटेड इलेक्ट्रिक होम अप्लायन्सेस वापरा

यासह, तुम्ही वीज वापर कमी करण्यासाठी एलईडी दिवे किंवा हाय रेटेड असलेली विद्युत गृह उपकरणे खरेदी करू शकता.

First published:
top videos

    Tags: Electricity, Electricity bill, Money, Summer season