नवी दिल्ली, 31 जानेवारी: भारतात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड सुरु आहे. डिजिटल पेमेंटसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI सारखी सुविधा तुम्हाला घरबसल्या सहज पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देते. यासाठी तुम्हाला फक्त पेटीएम, फोनपे, भीम, गुगलपे इत्यादी UPI सपोर्टिंग अॅप्सची गरज आहे. विशेष म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी यापैकी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला मनी ट्रान्सफरची सुविधा देते. यूपीआय द्वारे तुम्ही आयसीआयसीआय क्रेडिट कार्डचे बिल देखील भरु शकता. ते कसे भरता येईल याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
ICICI क्रेडिट कार्ड भरणं अगदी सोपं
सध्याच्या काळात मार्गेटमध्ये CRED, Paytm, Mobikwik, Phonepe, Amazon Pay सारखी अनेक प्रसिद्ध थर्ड पार्टी मोबाईल अॅप्लिकेशन्स आहेत. ज्याद्वारे तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल भरू शकता. मात्र, या अॅप्सद्वारे पेमेंटवर सेटलमेंट करण्यास विलंब होऊ शकतो. तर, UPI द्वारे पेमेंट केल्यावर, ते तुमच्या क्रेडिट कार्ड खात्यात लगेच दिसून येते. -सर्वात पहिले BHIM, Paytm, Phonepe, Amazon किंवा कोणतेही UPI अॅप्लिकेशन ओपन करा. -Send Money किंवा Send Money To Anyone किंवा ट्रान्सफर मनी आदीवर क्लिक करा. - यानंतर UPI आयडी टाकण्याचा ऑप्शन दिसेल. - आता UPI आयडीच्या जागी ccpay.16 Digit Credit Card Number@icici टाका. तो व्हेरिफाय केल्यावर, तुमचे नाव न दिसता क्रेडिट दिसेल. - आता अमाउंट टाका आणि Proceed वर क्लिक करा. आता UPI अॅपमध्ये लिंक केलेल्या बँक अकाउंटद्वारे UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करा.
UPI म्हणजे काय?
UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी मोबाईल अॅपद्वारे बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकते. UPI द्वारे, तुम्ही एक बँक खाते अनेक UPI अॅप्सशी लिंक करू शकता. तसेच एका UPI अॅपद्वारे अनेक बँक अकाउंट ऑपरेट केली जाऊ शकतात.