मराठी बातम्या /बातम्या /मनी /

NPS खातं उघडण्यासाठी काय आहे वयाची मर्यादा? हे नियम समजून घ्या

NPS खातं उघडण्यासाठी काय आहे वयाची मर्यादा? हे नियम समजून घ्या

NPS योजनेसाठी कोणाला करता येतो अर्ज? हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

NPS योजनेसाठी कोणाला करता येतो अर्ज? हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

NPS योजनेसाठी कोणाला करता येतो अर्ज? हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : रिटायरमेंटनंतर आपलं आयुष्य चांगलं आणि टेन्शन फ्री घालवायचं असेल तर तुम्ही नक्की या योजनेचा लाभ घ्यायला हवा. या योजनेमध्ये कोण गुंतवणूक करू शकतात आणि नियम काय आहेत त्याबद्दल आज जाणून घेऊया. एवढंच नाही तर याला आयकरातूनही सूट आहे.

नोकरीच्या सुरुवातीच्या काळात निवृत्तीचे नियोजन आणि त्यासाठी गुंतवणूक सुरू करावी. आजच्या काळात रिटायरमेंटवर मोठ्या कॉर्पससोबत मासिक पेन्शन मिळवण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टिम हा चांगला पर्याय आहे. 'एनपीएस'मध्ये भारतातील ज्या नागरिकाचे वय 18 ते 70 वर्षांदरम्यान आहे, अशा कोणत्याही नागरिकाला काही आवश्यक प्रक्रियेनंतर या योजनेत सहभागी होता येते.

पेन्शनशी संबंधित इतरही अनेक योजना बाजारात आहेत. जर तुम्ही एनपीएसमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली असेल किंवा ती करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासंबंधी काही महत्त्वाचे नियम माहीत असायला हवेत.

NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्याचे वय 18-70 वर्षांपर्यंत असायला हवं.

65-70 वर्षांपर्यंतचे नागरिक OCI मध्ये पैसे गुंतवू शकतात

5 लाखांपर्यंतची रक्कम खात्यावरून काढणं आता सहज शक्य झालं आहे.

रकमेच्या 40 टक्के एन्युटी घेणं अनिवार्य आहे

वयाच्या 65 वर्षांनंतर 50 टक्के एलोकेशन करू शकता

NPS मध्ये पैसे गुंतवणं हे भविष्याची एकप्रकारे सुरक्षिकता लक्षात घेता चांगला निर्णय आहे. यामध्ये दोन प्रकारे खातं उघडता येतं. टियर 1 आणि टियर २ असे दोन प्रकार आहेत. यात टियर १ पेन्शन खाते आणि टियर २ ऐच्छिक बचत खाते आहे. टियर-१ खाते कोणीही उघडू शकते पण टियर-१ खाते असेल तरच टियर-२ खाते उघडता येते.

गुंतवणूकदारांना एनपीएसमध्ये एक्स्ट्रा टॅक्स बेनिफिटचा पर्यायही मिळतो. टियर -1 खात्यावरच टॅक्समधून सूट मिळते. एनपीएस अंतर्गत आयकर कायद्याच्या कलम ८०सीसीडी (१बी) अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक करसवलतीसह उपलब्ध आहे. कलम ८०सी अंतर्गत तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंतची मर्यादा पूर्ण केली असेल तर एनपीएस तुम्हाला अतिरिक्त करबचतीसाठीही मदत करू शकतो. या योजनेच्या मॅच्युरिटीवर ६० टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्यावर कोणताही कर नाही.

First published:

Tags: Pension, Pension funds, State goverment