मराठी बातम्या /बातम्या /मनी /UPI Payment Without Internet: टेन्शनच संपलं! इंटरनेटशिवायही करू शकता UPI पेमेंट; प्रोसेस आहे खूपच सोपी

UPI Payment Without Internet: टेन्शनच संपलं! इंटरनेटशिवायही करू शकता UPI पेमेंट; प्रोसेस आहे खूपच सोपी

UPI Payment Without Internet: टेन्शनच संपलं! इंटरनेटशिवायही करु शकता UPI पेमेंट; प्रोसेस आहे खूपच सोपी

UPI Payment Without Internet: टेन्शनच संपलं! इंटरनेटशिवायही करु शकता UPI पेमेंट; प्रोसेस आहे खूपच सोपी

UPI Payment Without Internet: UPI पेमेंट प्रणालीने डिजिटल पद्धतीने होणाऱ्या व्यवहारांमध्ये मोठी क्रांती घडवून आणली आहे. आज देशातील अधिकाधिक लोक UPI द्वारे व्यवहार करत आहेत.

मुंबई, 5 जुलै : UPI पेमेंट प्रणालीने (UPI Payments) डिजिटल पद्धतीने होणाऱ्या व्यवहारांमध्ये मोठी क्रांती घडवून आणली आहे. आज देशातील अधिकाधिक लोक UPI द्वारे व्यवहार करत आहेत. खासकरून कोरोनानंतर या डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम बँका किंवा एटीएमबाहेर लागणाऱ्या रांगा आता दिसेनाशा झाल्या आहेत.

UPI ने डिजिटल व्यवहार खूप सोपं केलं आहे. याच कारमामुळं देशात डिजिटल व्यवहार करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली आहे. आज आपण PhonePe, Paytm किंवा Google Pay च्या माध्यमातून UPI द्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार करत आहोत.

UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी, आपल्याला इंटरनेटची आवश्यकता असते, हे आपण जाणतोच. परंतु तुम्ही इंटरनेटशिवायही UPI सह पेमेंट करू शकता, हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण अशा प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशिवाय UPI पेमेंट (UPI Payment Without Internet) करू शकता. चला तर मग, जाणून घेऊया प्रोसेस -

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट कसं करायचं?  (How to Make UPI Payment Without Internet)-

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्यासाठी तुम्हाला USSD कोडची मदत घ्यावी लागेल. या सेवेद्वारे, तुम्ही इंटरनेटशिवाय UPI द्वारे इतर कोणत्याही व्यक्तीला पेमेंट करू शकता.

हेही वाचा: पर्सनल लोन इतर कर्जांपेक्षा महाग का असतं? काय आहेत कारणं?

मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या फोनमध्ये मोबाईल नेटवर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये *99# डायल करावे लागेल.

हा नंबर डायल करून तुम्ही UPI द्वारे कोणत्याही व्यक्तीला पेमेंट करू शकता. याशिवाय, तुम्ही येथून तुमचा UPI पिन बदलू शकता. मोबाईलमध्ये *99# डायल केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर अनेक पॉप मेनू उघडतील. येथे 1 नंबर पाठवल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पैसे पाठवण्यासाठी मोबाइल नंबर, UPI आयडी, बँक खाते क्रमांक इत्यादीसारखे अनेक पर्याय मिळतील.

यानंतर, तुम्हाला ज्या माध्यमातून पैसे पाठवायचे आहेत ते माध्यम निवडा. त्यानंतर, तुम्हाला रक्कम भरून UPI ​​पिन प्रविष्ट करावा लागेल. या प्रक्रियेचे अनुसरण करून, तुम्ही इंटरनेटशिवाय सहजपणे UPI पेमेंट करू शकता.

First published:

Tags: Online payments, QR code payment, Upi