मुंबई, 15 ऑगस्ट : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सॉव्हरेन गोल्ड बाँड (SGB) योजनेच्या सदस्यत्वासाठी दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. SGB योजनेची दुसरी मालिका 22 ऑगस्ट रोजी उघडली जाईल आणि 26 ऑगस्ट रोजी बंद होईल. याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. SGB प्लॅनची पहिली मालिका या वर्षी 20 जून ते 24 जून दरम्यान सुरू करण्यात आली होती.
सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने देत नाही, परंतु सोन्यात पैसे गुंतवण्याची संधी देते. यामध्ये एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात एक ग्रॅम ते चार किलोपर्यंत सोने खरेदी करू शकते. परताव्याबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या एका वर्षात सोन्याने आपल्या गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. हा पहिला इश्यू 2022-23 या आर्थिक वर्षात उघडला गेला आहे.
डिजीटल माध्यमातून गोल्ड बॉण्ड्ससाठी अर्ज करणार्या आणि पेमेंट करणार्या गुंतवणूकदारांसाठी इश्यूची किंमत 50 रुपये प्रति ग्रॅमने कमी होईल. RBI ने सांगितले की, गुंतवणूकदारांना निश्चित किंमतीवर सहामाही आधारावर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाईल.
बॉण्ड खरेदी मर्यादा कमाल 4 किलोपर्यंत
सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेत, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो सोन्याचे बॉण्ड खरेदी करू शकते. किमान गुंतवणूक एक ग्रॅम आहे. त्याच वेळी, ट्रस्ट किंवा तत्सम संस्था 20 किलोपर्यंतचे बॉण्ड खरेदी करू शकतात.
सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू
सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. आरबीआय हे बाँड सरकारच्या वतीने जारी करते. हे फक्त निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना विकले जाऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Investment, Money, Sovereign gold bond scheme