मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Financial Tips: स्वातंत्रदिनी करा संकल्प; आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी 'या' गोष्टी काटेकोरपणे पाळा

Financial Tips: स्वातंत्रदिनी करा संकल्प; आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी 'या' गोष्टी काटेकोरपणे पाळा

Financial Tips: तुमच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा. जेव्हा शक्य होईल तेव्हा बचत करा, तरच तुम्ही जास्त पैसे वाचवू शकाल.

Financial Tips: तुमच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा. जेव्हा शक्य होईल तेव्हा बचत करा, तरच तुम्ही जास्त पैसे वाचवू शकाल.

Financial Tips: तुमच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा. जेव्हा शक्य होईल तेव्हा बचत करा, तरच तुम्ही जास्त पैसे वाचवू शकाल.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 15 ऑगस्ट: आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देश या 75 वर्षात दररोज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहिला. मात्र आता वैयक्तिक प्रगती साधनेही तितकचं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या खंबीर होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी गोष्टीचं काटेकोरपणे पालन करणे गरजेचं आहे. बचत करा आणि गुंतवणूक करा तुमच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा. जेव्हा शक्य होईल तेव्हा बचत करा, तरच तुम्ही जास्त पैसे वाचवू शकाल. उरलेल्या रकमेतून गुंतवणूक करा, म्हणजे तुमची कमाई चक्रवाढ व्याज दराने वाढेल. तुमच्या मासिक पगाराच्या 25-30 टक्के बचत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. बचत करण्यासाठी, तुम्ही एकाच वेळी भरपूर बचत करण्याऐवजी लहान सुरुवात करावी. ही छोटी बचत पुढे मोठ्या बचतीच्या रूपात येईल. क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर ते हुशारीने वापरा. एकूण मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त खर्च करू नका. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डची थकबाकी दर महिन्याला वेळेवर भरा. India@75: 12 पैशात तांदूळ, 80 रुपयांत 1 तोळा सोनं.. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत किती बदल झाला? विश्वास नाही बसणार
विमा पॉलिसी घ्या महामारीच्या काळात विम्याचे महत्त्व लोकांना कळले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे. तुमचा अकाली मृत्यू झाल्यास टर्म इन्शरन्स तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत करेल. आरोग्य विम्यामुळे वैद्यकीय खर्चाच्या ओझ्यातून मुक्तता होईल. त्याची व्याप्ती वार्षिक उत्पन्नाच्या किमान 50% असावी. कर्ज घेणे टाळा तुम्हाला आवश्यक तेवढेच कर्ज घ्या, जे कमी वेळेत फेडता येईल. यासोबत तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागणार नाही याची खबरदारी घ्या. कर्ज घेण्यापूर्वी अनेक वित्तीय कंपन्या आणि बँकांच्या कर्ज योजनांची नक्कीच माहिती घ्या. मग तुम्ही कर्ज कुठून घेत आहात, ते तुमच्याकडून कोणतेही छुपे शुल्क तर घेत नाही ना हेही तपासा. Health Insurance घेताना 'या' गोष्टी नक्की तपासा, अन्यथा पैसेही जातील आणि क्लेमही सेटल होणार नाही खर्चाचा तपशील लिहून ठेवा पैसे खर्च करताना ते योग्य ठिकाणी खर्च होतायत का याची तपासणी करा. खर्च अनावश्यक असेल तर तो टाळला पाहिजे. अनावश्यक खर्च टाळल्यास पैशांची बचत होण्यास मदत होईल. जिथे गरज नाही तिथे केवळ दिखाव्यासाठी काही खर्च करु नका. जर तुम्हाला बचत करायची असेल तर तुमचे ध्येय मोठे असले पाहिजे हे लक्षात ठेवा. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत  उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत असतील तर उत्पन्नही वाढते आणि त्याचबरोबर बचतही वाढते. उत्पन्नाचा हा स्त्रोत घरभाडे, शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही बाजूच्या व्यवसायातून असू शकतो.
First published:

Tags: Investment, Money

पुढील बातम्या