जाहिरात
मराठी बातम्या / मनी / झिरो क्रेडिट स्कोअरमध्येही लोन मिळतं का? काय असते प्रोसेस?

झिरो क्रेडिट स्कोअरमध्येही लोन मिळतं का? काय असते प्रोसेस?

झिरो क्रेडिट स्कोअर

झिरो क्रेडिट स्कोअर

तुम्ही कधीही कर्ज घेतले नसेल आणि तुमचा क्रेडिट स्कोर अजूनही शून्य असेल, तरीही तुम्हाला कर्ज मिळू शकते. अशा वेळी कर्ज मिळणे अवघड असले तरी काही बँका तुम्हाला काही रक्कम जास्त व्याजदराने कर्ज म्हणून देऊ शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 एप्रिल: एखाद्या वेळी अचानक पैशांची गरज भासते. पण आपल्या जवळ तेवढे पैसे नसतात. या वेळी कर्ज घेण्याचा विचार डोक्यात येतो. मात्र त्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे सर्वात महत्वाचे आहे. कारण बँक तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारे कर्जाची रक्कम आणि त्याचा व्याजदर ठरवते. पण जर एखाद्याने यापूर्वी कधीही कर्ज घेतले नसेल म्हणजेच त्याचा क्रेडिट स्कोर शून्य असेल तर त्याला कर्ज कसे मिळणार?

News18लोकमत
News18लोकमत

क्रेडिट स्कोअर खराब असेल किंवा झिरो असेल तर कर्ज मिळणे कठीण असतं. परंतु थोडे प्रयत्न केले तर ते मिळतं देखील. मात्र, हे कर्ज तुम्हाला महागात पडू शकतं. क्रेडिट स्कोअरशिवाय तुम्ही पहिल्यांदा कर्ज कसे मिळवू शकता आणि त्याची रक्कम किती असेल हे आपण जाणून घेऊया.

झिरो क्रेडिट स्कोअरवर कसं मिळेल कर्ज

जर तुम्ही यापूर्वी कधीही कर्ज घेतले नसेल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर अजूनही शून्य असेल, तरीही तुम्ही कोणत्याही बँकेकडून कर्जासाठी अर्ज करू शकता. मात्र, मंजुरी मिळेल की नाही हे ठोसपणे सांगता येत नाही. तुमच्या सॅलरी स्लिप इत्यादीच्या आधारे अनेक बँका तुम्हाला कर्ज देण्यास तयार असू शकतात. पण हे कर्ज तुम्हाला थोडे महाग पडू शकते. म्हणजेच यासाठी तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल किंवा तुम्हाला कमी कर्ज मिळेल.

FD बेस्ट की डेट म्यूच्युअल फंड? कशात जास्त सुरक्षित असतो पैसा? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात

पहिल्यांदा कर्ज घेण्याची पात्रता काय?

तुम्ही पगारदार कर्मचारी असाल आणि दर महिन्याला तुमच्या बँक खात्यात पैसे येत असतील तर तुम्हाला कर्ज मिळू शकते. कर्ज घेण्यासाठी पगारदार कर्मचाऱ्याचे मासिक उत्पन्न 13,000 रुपये असायला हवे. तर व्यावसायिकाचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त असावे. किमान ही रक्कम दरमहा तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला हवी. एवढंच नाही तर तुमचं वय 21 ते 57 वर्षे दरम्यान असावे. जर तुम्ही या अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला क्रेडिट स्कोअर नसतानाही कर्ज मिळू शकते.

चेक भरताना केलेली एक चुक तुम्हाला टाकू शकते तुरुंगात, जाणून घ्या नेमका नियम काय?

असा उभारता येईल क्रेडिट स्कोअर

आजकाल क्रेडिट स्कोअर बनवणे खूप सोपं झालंय. तुम्ही कोणत्याही क्रेडिट लाइन किंवा पे लेटर आणि पोस्ट पेड सुविधेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला खर्च करण्यासाठी काही रक्कम दिली जाते. जे तुम्हाला ठराविक कालावधीत परत करावे लागेल. तो खर्च केल्यानंतर तुम्ही परतफेड करताच तुमची मर्यादा वाढत जाते. तसेच, तुम्हाला क्रेडिट देणारी कंपनी तुमचा रिपोर्ट क्रेडिट ब्युरोसोबत शेअर करते. जेणेकरून तुमचा क्रेडिट स्कोअर तयार करता येईल. मात्र, यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळी ड्यू डेटपूर्वी बिल भरण्याची पूर्ण काळजी घ्यावी. अन्यथा, तुमचा क्रेडिट स्कोअर तयार होताच तो बिघडू लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: loan
  • First Published :
जाहिरात
जाहिरात