मराठी बातम्या /बातम्या /मनी /

यूपीआय पेमेंट चुकीच्या बँक खात्यावर गेल्यास पैसे परत कसे मिळवावे? जाणून घ्या

यूपीआय पेमेंट चुकीच्या बँक खात्यावर गेल्यास पैसे परत कसे मिळवावे? जाणून घ्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे कोणताही व्यवहार पटकन होतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

एटीएम, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग यांच्यामुळे व्यवहार सोपे झाले होते. यूपीआयच्या सुविधेमुळे त्यात गतिमानता आली. तसंच कोणालाही, कोणत्याही वेळी व देशाच्या कोणत्याही भागात पैसे पाठवणं सोयीचं झालं. इंटरनेट असेल, तर यूपीआय पेमेंट हा पैशांच्या व्यवहारासाठी अतिशय सोपा मार्ग असतो. मात्र काही वेळेला यात चुकीच्या व्यक्तीला पैसे जाण्याचा धोका असतो. अशा वेळी पैसे परत कसे मिळवता येतील, याबाबत ‘आज तक हिंदी’नं वृत्त दिलं आहे.

यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे कोणताही व्यवहार पटकन होतो. ऑनलाईन खरेदी असो किंवा किराणा, भाजी घ्यायची असो यूपीआयद्वारे पैसे देता येतात, मात्र काही वेळेला घाईगडबडीत चुकीच्या क्यूआर कोडला पैसे पाठवल्यानं, किंवा चुकीच्या मोबाईल क्रमांकाला पैसे पाठवल्यानं ग्राहक अडचणीत येऊ शकतात. ग्राहकांकडे काही पर्याय उपलब्ध असतात.

रिझर्व्ह बँकेच्या सूचना काय सांगतात?

ग्राहकांकडून चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले गेले, तर bankingombudsman.rbi.org.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवता येते. पैसे परत मिळवण्यासाठी बँकेत अर्ज करावा लागतो. त्यात तुमच्या बँक खात्याची व चुकून पैसे पाठवलेल्या खात्याचीही माहिती द्यावी लागते. तुमच्याकडून चुकून कोणाला पैसे पाठवले गेले हे माहीत असेल व ती व्यक्ती तुम्हाला पैसे परत करत नसेल, तर त्या व्यक्तीविरोधात NPCI च्या वेबसाईटवर तक्रार दाखल करता येते.

चुकीच्या यूपीआय पेमेंटचे पैसे परत मिळवण्यासाठी खात्यातून पैसे गेल्याच्या व्यवहाराचा मेसेज उपयोगी पडू शकतो. तो डिलीट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यूपीआय अ‍ॅपमध्ये रिफंडसाठी काही पर्याय असतात. त्या संदर्भात ग्राहक तक्रार दाखल करू शकतात. Paytm, GPay, PhonePe या अ‍ॅपद्वारे जर पैसे पाठवले असतील, तर कस्टमर सर्व्हिसमध्ये जाऊन मदत मागता येते. तसंच तक्रारही दाखल करता येते. त्यानंतर बँकेच्या हेल्पलाईन क्रमांकावरही फोन करून मदत मिळवता येते.

हेही वाचा - सणासुदीमुळे आर्थिक बजेट बिघडलं? काळजी नको, गाडी रुळावर आणण्याचा हा आहे प्रभावी मार्ग

NPCIवर तक्रार कशी करावी?

एनपीसीआयच्या (NPCI) वेबसाईटवर तक्रार दाखल करण्यासाठी Dispute Redressal Mechanism इथे जाऊन स्क्रोल करावं. त्यात ट्रॅन्जॅक्शन असं बटण असेल ते क्लिक करावं. तिथे ट्रान्जॅक्शन नेचर, इश्यू, ट्रान्जॅक्शन आयडी, बँक, व्यवहार झाल्याची तारीख, पैसे, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अशी महिती भरावी लागेल. अशा पद्धतीनं पेमेंट रिफंडसाठी अर्ज करता येऊ शकतो.

यूपीआय हा पैसे व्यवहारासाठी सोयीचा मार्ग असला, तरी त्यात अनेक धोकेही आहेत. त्यापैकी एक म्हणजे चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवले जाणं. मात्र ते पैसे परत मिळवण्याचे काही पर्याय उपलब्ध असतात. यूपीआय वापरणाऱ्यांनी त्याची माहिती घेणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Online payments, Payment, QR code payment, Upi