जाहिरात
मराठी बातम्या / मनी / अवकाळी पावसानं पीक खराब झालं, टेन्शन घेऊ नका, विम्यासाठी असा करा क्लेम

अवकाळी पावसानं पीक खराब झालं, टेन्शन घेऊ नका, विम्यासाठी असा करा क्लेम

अवकाळी पावसानं पीक खराब झालं, टेन्शन घेऊ नका, विम्यासाठी असा करा क्लेम

या योजनेत अगदी कमी पैसे भरून शेतकऱ्याला आपल्या पिकाचा विमा उतरवायचा असतो. जर पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला क्लेम करता येतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : देशात सध्या वातावर खूप खराब आहे. अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांसमोर जगायचं कसं हा प्रश्न आहे. जर पीक विमा काढला असेल तर कसा क्लेम करायचा सोप्या भाषेत समजून घेऊया. शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून पीएम पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत अगदी कमी पैसे भरून शेतकऱ्याला आपल्या पिकाचा विमा उतरवायचा असतो. जर पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला क्लेम करता येतो. विमा उतरवलेल्या पिकाचं नुकसान झालं तर विमा कंपनी त्याच्या नुकसानीची भरपाई देते. सुरुवातीला सरकारने बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा उतरवणे बंधनकारक केले होते.

News18लोकमत
News18लोकमत

आता शेतकऱ्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याने आपल्या पिकाचा विमा काढावा की नाही. बहुतांश शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा काढतात. शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई कशी मिळते ते समजून घेऊया?

Crop Insurance : पिकांचं नुकसान झाल्यास सरकार करणार भरपाई, फक्त करा हे एक काम

पीएम किसान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढणे खूप सोपे आहे. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड तयार केलं आहे. इतर कोणतेही कृषी कर्ज घेतले आहे ते त्याच बँकेतून त्यांच्या पिकांचा विमा काढू शकतात. शेतकऱ्यांना बँकेत एक फॉर्म भरावा लागतो. बँकेकडे शेतकऱ्याची जमीन आणि इतर कागदपत्रे असल्याने विमा सहज होतो. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले नाही ते कोणत्याही बँकेकडून हा विमा घेऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्यात शासनाने एक किंवा अधिक विमा कंपन्यांना पीक विमा करण्याचे अधिकार दिले आहेत.

Pradhan Mantri Crop Insurance Scheme : शेतकऱ्यांना दिलासा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून ही महत्वाची काढली अट

आधारकार्ड, जमिनीशी संबंधित कागदपत्रे, शेतात पेरलेल्या पिकाचा तपशील आणि बँकेतील मतदार कार्ड असे ओळखपत्र घेऊन शेतकरी पीक विमा काढू शकतो. ३३ टक्के शेतीचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी अर्ज करता येतो. याशिवाय पुढील नंबरवर शेतकरी नुकसान भरपाईबाबत आणि पीक खराब झाल्याची माहिती देऊ शकतात. अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडचा टोल फ्री क्रमांक – 18004196116 SBI जनरल इन्शुरन्स कंपनीचा टोल फ्री क्रमांक – 18002091111 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड टोल फ्री क्रमांक – 18001024088 फ्यूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा टोल फ्री क्रमांक – 18002664141 बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड - 18002095959 एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी - 18002660700

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात