मुंबई : कोरोनानंतर डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे फोन पे आणि गुगल पेमेंटचं प्रमाण वाढलं आहे. त्यासोबत फसवणुकीचे प्रकार देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे तुमचा UPI पिन कोणाला कळणार नाही याची काळजी घ्या. तो सतत बदलता ठेवणं सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो पिन कसा चेंज करायचा ते समजून घेऊया.
तुम्हाला गुगल पेचा जर पिन चेंज करायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला गुगल पेवर जावं लागेल. तिथे तुम्ही उजव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाईलवर क्लीक करा. तिथे बँक अकाउंटवर जा. त्यानंतर तुम्हाला एडिट पर्याय निवडायचा आहे. तिथे Tap to more पर्याय निवडा. तिथे पिन चेंज करायचा पर्याय येईल.
ऑनलाईन व्यवहार करताना 'या' टिप्स लक्षात ठेवा, तुमचे बँकेतील पैसे राहतील सुरक्षित
तुम्हाला नवीन पिन अपलोड करायचा आहे. पुन्हा एकदा तुम्ही तिथे नवीन पिन अपलोड करा आणि सेव्ह करा. तुमचा नवीन पिन सेव्ह होईल. अशा पद्धतीनं तुम्ही पिन चेंज करू शकता आणि तुमचं गुगल पेमेंट सिक्युअर करू शकता.
फोनपेमध्ये पिन कसा करायचा रिसेट
तुमच्या स्मार्टफोनवर PhonePe ऍप्लिकेशन उघडा.
डिस्प्लेच्या वरच्या उजव्या कोपर्यात उपलब्ध मेनू निवडा.
आता बँक खाते उघडा आणि तुम्हाला पिन बदलायचा आहे तो निवडा.
तुमच्या बँक खात्यासाठी UPI पिन रीसेट करा वर टॅप करा.
UPI Payment चा वापर करता? चुकूनही करू नका हे काम, रिकामं होईल बँक अकाउंट
तुमचा UPI आणि पिन कधीही शेअर करु नका
तुमची UPI आणि पिन माहिती कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. तुम्हाला कॉल करणारी किंवा मेसेज करणारी व्यक्ती स्वत:ला सरकारी संस्था किंवा बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगत असली तरीही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बँका, सरकारी संस्था आणि कंपन्या कधीही UPI पिन मागत नाहीत. सहसा, फसवणूक करणारे खाते बंद होण्याची भीती दाखवून किंवा अॅप अपडेट करण्याचे नाटक करून यूजर्सना पिन मागतात. त्यामुळे जर कोणी तुम्हाला तुमचा पिन विचारत असेल तर त्यांना कधीही सांगू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Online payments, Upi