जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमच्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटा कुठे बदलता येतात? RBI चे नियम काय सांगतात?

तुमच्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटा कुठे बदलता येतात? RBI चे नियम काय सांगतात?

तुमच्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटा कुठे बदलता येतात? RBI चे नियम काय सांगतात?

Damage Currency Note Exchange Rule: तुमच्या बँकेच्या शाखेने नोट बदलण्यास नकार दिल्यास त्या बँकेवर कारवाई होऊ शकते. मात्र, नोटेची स्थिती जितकी वाईट असेल तितकी तिची किंमत कमी होईल, हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 एप्रिल : आपल्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटा नक्की कुठी बदलून (Damage Currency Note Exchange Rule) घ्यायच्या हे अनेकदा आपल्या माहिती नसतं. त्यामुळे या फाडलेल्या नोटा पाकीटात किंवा घरातच कुठेतरी पडून राहतात. मात्र याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने (RBI) काही तरतुदी केल्या आहेत ज्या सर्वसामान्यांसाठी माहिती असणे गरजेचं आहे. नियमानुसार तुम्ही फाटलेल्या नोटा बँकेत सहजपणे बदलू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेने फाटलेल्या नोटांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. फाटलेल्या नोटा देशातील कोणत्याही बँकेतून बदलून घेता येतात. यासाठी तुम्ही केवळ होम ब्रँचमध्येच जावे असे नाही. तुमच्या बँकेच्या शाखेने नोट बदलण्यास नकार दिल्यास त्या बँकेवर कारवाई होऊ शकते. मात्र, नोटेची स्थिती जितकी वाईट असेल तितकी तिची किंमत कमी होईल, हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. नोटा बदलण्याचे नियम काय आहेत? कमी मूल्याच्या नोटा 5, 10, 20, 50 यासारख्या छोट्या फाटलेल्या नोटा ज्याचा किमान 50 टक्के भाग सुरक्षित असेल, तर त्या बदल्यात तुम्हाला या नोटा बदलून मिळतील. LIC प्रीमियम भरण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घसबसल्या ऑनलाईन जमा करा; कसं? उच्च मूल्याच्या नोट्स जर फाटलेल्या नोटांची संख्या 20 पेक्षा जास्त असेल, जर नोटांचे मूल्य 5000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला यासाठी शुल्क भरावे लागेल. सिक्युरिटी साईन नोट बदलण्यासाठी महत्त्वाचा नियम असा आहे की, जर नंबर, गांधीजींचा वॉटरमार्क, गव्हर्नरची स्वाक्षरी इत्यादी सिक्युरिटी साईन दिसत असतील तर बँक अशा नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. Tata च्या ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांची बक्कळ कमाई, दोन वर्षात 2 रुपयांचा शेअर 175 रुपयांवर RBI कडे पाठवा तुमच्याकडे असलेल्या नोटा खूप फाटलेल्या, अनेक तुकड्यांमध्ये असतील, तर अशा परिस्थितीत तुम्हाला या नोटा पोस्टाने आरबीआय शाखेत पाठवाव्या लागतील. जिथे खाते क्रमांक, IFSC कोड, नोटेची किंमत किती आहे अशी माहिती देणे आवश्यक आहे. फाटलेल्या नोटेचे काय होते? आरबीआय या नोटा वापरातून काढून टाकते, या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा छापण्याची जबाबदारीही रिझर्व्ह बँकेची आहे. या नोटांचे लहान तुकडे करून त्यांचा पुनर्वापर केला जातो, ज्याचा वापर नंतर कागदाच्या इतर वस्तू बनवण्यासाठी केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money , rbi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात