मराठी बातम्या /बातम्या /मनी /EPFO New Rule: तुमच्या PF वर कसं आणि किती मिळतं व्याज; असं तपासा

EPFO New Rule: तुमच्या PF वर कसं आणि किती मिळतं व्याज; असं तपासा

तुम्ही प्रॉव्हिडंट फंडमध्ये (Provident Fund) वर्षाला किती पैसे जमा करू शकता, त्यावर व्याजाची गणना कशी केली जाते हे आणि यातील शिल्लक कशी वाढते याबद्दल जाणून घेऊ या.

तुम्ही प्रॉव्हिडंट फंडमध्ये (Provident Fund) वर्षाला किती पैसे जमा करू शकता, त्यावर व्याजाची गणना कशी केली जाते हे आणि यातील शिल्लक कशी वाढते याबद्दल जाणून घेऊ या.

तुम्ही प्रॉव्हिडंट फंडमध्ये (Provident Fund) वर्षाला किती पैसे जमा करू शकता, त्यावर व्याजाची गणना कशी केली जाते हे आणि यातील शिल्लक कशी वाढते याबद्दल जाणून घेऊ या.

नवी दिल्ली 18 जून : निवृत्तीनंतरच्या आयुष्याची तरतूद करण्याकरता नोकरदार व्यक्तींसाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund) हा उत्तम पर्याय मानला जातो. तुम्ही प्रॉव्हिडंट फंडमध्ये वर्षाला किती पैसे जमा करू शकता, त्यावर व्याजाची गणना कशी केली जाते हे आणि यातील शिल्लक कशी वाढते याबद्दल जाणून घेऊ या.

20 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांसाठी पीएफचे योगदान आवश्यक आहे :

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) निवृत्तीसाठी बचत करण्याचा एक मान्यताप्राप्त मार्ग आहे. एखाद्या कंपनीत 20 किंवा अधिक कर्मचारी असल्यास त्यांना ईपीएफमध्ये योगदान द्यावं लागतं. बेसिक पगाराच्या 12 टक्के रक्कम कर्मचार्‍यांद्वारे जमा केली जाते आणि कंपनी 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) आणि 3.67 टक्के ईपीएफमध्ये (EPF) योगदान देते. यामध्ये मासिक शिल्लकीच्या (Monthly Balance) आधारे व्याज दिले जाते. आर्थिक वर्षाच्या शेवटी ते खात्यात जमा केले जाते.

पीएफचा सध्याचा व्याज दर किती आहे?

ईपीएफवरील व्याज दर (Interest Rate) मार्केटवर अवलंबून असतात. सध्याचा व्याज दर हा 8.5 टक्के आहे. गेल्या आर्थिक वर्षा इतकाच हा दर आहे.

व्याज कसे मोजले जाते ? :

कर्मचाऱ्याचा बेसिक पे (Basic Pay )आणि महागाई भत्ता (Dearness Allowance) 15 हजार रुपये आणि त्यावर 8.5 टक्के व्याज दर गृहित धरुन खालीलप्रमाणे व्याज काढता येईल.

बेसिक पे आणि महागाई भत्ता - 15,000 रुपये

कर्मचार्‍यांचे ईपीएफ योगदान – 15000चे 12 टक्के = 1,800 रुपये

कंपनीचे योगदान :

ईपीएसमध्ये- 8.33 टक्के = 1250 रुपये

ईपीएफमध्ये 3.67 टक्के = 550 रुपये

एकूण योगदान = 2,350 रुपये (कर्मचारी EPF + कंपनी EPF)

सध्याचा व्याज दर = 8.5 टक्के

PM Kisan: तुम्हालाही अशाप्रकारे मिळालेत अनेक हप्ते, तर परत करण्यासाठी राहा तयार

मासिक शिलकीवर व्याज मोजले जाते आणि म्हणून दरमहा व्याज = 8.5 टक्के / 12 = 0.7083 टक्के असेल

पहिल्या महिन्यात ईपीएफवर कोणतेही व्याज मिळत नाही.

दुसर्‍या महिन्याचे योगदान = 2,350 रुपये

एकूण ईपीएफ शिल्लक = 4,700 रुपये.

ईपीएफ योगदान व्याज = 0.7083 टक्के प्रमाणे 4,700रुपयांवर = 33.29 रुपये.

पीएफमध्ये वर्षाला किती रक्कम जमा करता येईल ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच कर्मचार्‍यांकरता करमुक्त पीएफ योगदानाची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी अर्थसंकल्पात ही मर्यादा वार्षिक अडीच लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव होता, तो नंतर बदलण्यात आला.

2 रुपयांचं हे नाणं बनवेल लखपती! वाचा कशी करता येईल 5 लाख रुपयांची कमाई

पीएफमध्ये किती रक्कम जमा करता येईल ?

कर्मचार्‍यांना पीएफमध्ये बेसिक पगाराच्या 12 टक्के हिस्सा द्यावा लागतो. खासगी कर्मचार्‍यांकडे पीएफमधील योगदान वाढविण्याची संधी फारच कमी असते; परंतु सरकारी कर्मचार्‍यांना ही मर्यादा वाढविण्याचा पर्याय आहे.

First published:

Tags: Epfo news, PF Amount