मुंबई, 5 जून : देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्डचा (Credit Card) कल वाढला आहे. मात्र जर एखादवेळी क्रेडिट कार्ड हरवलं तर आपली तारांबळ होते. हरवलेले क्रेडिट कार्ड बंद कसं करायचं असा प्रश्न पडतो. जर तुम्ही ICICI क्रेडिट कार्ड (ICICI Bank Credit Card) वापरत असाल आणि ते अचानक हरवले तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला ते ब्लॉक (How to block ICICI Credit Card) करण्याची प्रक्रिया माहित असणे आवश्यक आहे. तुम्ही अनेक प्रकारे ICICI क्रेडिट कार्ड ब्लॉक करू शकता. जवळच्या शाखेत जाऊन तुम्ही ICICI बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन क्रेडिट कार्ड ब्लॉकसाठी विनंती करू शकता. कस्टमर केअरद्वारे संपर्क साधून तुम्ही ICICI बँकेच्या कस्टमर केअर नंबर - 1860 120 7777 वर कॉल करून तुमचे कार्ड ब्लॉक करू शकता. Auto Tips: गाडी चालवताना ‘हे’ नियम पाळा, पेट्रोल-डिझेलवर होणारा हजारोंचा खर्च वाचवा iMobile अॅप अॅपद्वारे ICICI बँकेच्या iMobile अॅपमध्ये, तुम्हाला सर्व्हिसेसवर क्लिक करावे लागेल, आता कार्ड सर्व्हिसेस पर्यायावर क्लिक करा. यानंतर ब्लॉक क्रेडिट कार्ड निवडा. पुढील स्क्रीनवर, तुम्हाला कार्ड प्रकार आणि कार्ड क्रमांक निवडावा लागेल. आता Submit वर क्लिक करा. कार्ड त्वरित ब्लॉक केले जाईल. Multibagger Share: 11 रुपयांचा शेअर खरेदी करुन कमावले लाखो रुपये; तुमच्याकडे आहे का? नेट बँकिंगद्वारे सर्व प्रथम https://www.icicibank.com/ वर जा. आता Login वर क्लिक करा. यूजर आयडी आणि पासवर्ड टाका आणि क्रेडिट कार्ड सेक्शनमध्ये जा. पुढील पेजवर, तुमच्याकडे क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याचा पर्याय असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.