जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लग्नासाठी लोनं हवं मात्र बँकेत जायला वेळ नाही? online असं करा Apply

लग्नासाठी लोनं हवं मात्र बँकेत जायला वेळ नाही? online असं करा Apply

लग्नासाठी लोनं हवं मात्र बँकेत जायला वेळ नाही? online असं करा Apply

हातात चार पैसे जास्त असते तर कदाचित छान लग्न करता आलं असतं असं म्हणायची वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: आयुष्यात लग्न एकदाच होतं, त्यामुळे ते छान थाटामाटात करावं अशी प्रत्येकाची इच्छा असतो. कधी ते शक्य होतं कधीकधी परिस्थिती आणि पैशांमुळे घोडं अडतं. त्यावेळी हातात चार पैसे जास्त असते तर कदाचित छान लग्न करता आलं असतं असं म्हणायची वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहोत. तुम्ही आता थाटामाट लोन घेऊन लग्न करू शकता. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून लोन घेता येतं. तुम्हाला बँकेत जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. त्यासाठी कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही दर महिन्याला EMI भरून हे लोन फेडू शकता.

Marriage Loan : लग्नासाठी लोन मिळेल का?, त्यासाठी कुठे अर्ज करायचा?

IDFC बँकेतर्फे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्हाला त्यांच्या वेबसाइटवर भेट द्यायची आहे. तिथे तुम्ही अप्लाय पर्याय निवडू शकता. तुम्हाला तुमचा पिनकोड, मोबाईल नंबर आणि तुमची वाढदिवसाची पूर्ण तारीख अपलोड करायची आहे. त्यानंतर पुढे दिलेली माहिती आणि आवश्यक ती कागदपत्र जमा करून तुम्ही अर्ज करू शकता. हे लोन फेडण्याचा कालावधी 6 महिने ते 60 महिन्यांपर्यंतचा आहे. तुम्हाला पर्सनल लोन १ लाख रुपयांपर्यंत मिळू शकतं. त्यावर १०.४९ टक्के तुम्हाला व्याजदर लागेल वर्षाला, तुमची प्रोसेसिंग फी आणि EMI मिळून ९,२६३ रुपये लागणार आहेत. एक लाखासाठी तुम्हाला साधारण 2,149 रुपये EMI बसू शकतो अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. प्रत्येक बँकेचा EMI आणि इंटरेस्ट रेट हा वेगवेगळा असू शकतो. याशिवाय प्रोसेसिंग फीमध्ये देखील फरक असू शकतो. त्यामुळे मॅरेज लोन घेताना याबाबत चौकशी करूनच ती घ्या. कमी व्याजदर असलेल्या बँकेचं लोन घेता आला तर तुम्हाला जास्त फायदा मिळेल.

पुन्हा EMI आणि होम लोन वाढणार? RBI ची आज महत्त्वपूर्ण बैठक
News18लोकमत
News18लोकमत

साधारण 21 ते 23 वर्षांपासूनचे तरुण यासाठी अर्ज करू शकतात. तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत तुम्ही पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता. फक्त तुम्ही कमवते असणं आवश्यक आहे. तुम्ही दर महिन्याला 15 हजार रुपयांपर्यंत कमवत असाल तर तुम्ही लोनसाठी अर्ज करायला पात्र आहात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात