नवी दिल्ली, 28 मार्च : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डवर (Ration Card) स्वस्त दरातील धान्य घेत नसाल, तर तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं. तुमचंही रेशन कार्ड रद्द झालं असेल तर ते पुन्हा अॅक्टिव्ह करता (How to active Cancelled Ration Card) येईल. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (Public Distribution System) कुटुंबातील सदस्य संख्येच्या आधारे सरकार लोकांना अत्यंत स्वस्त दरात रेशन पुरवते. गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करणं हा त्यामागचा उद्देश आहे. परंतु अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यांनी मागील कित्येक महिन्यांपासून रेशन कार्डवर दिलं जाणारं धान्य घेतलं नाही. अशा लोकांचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं.
नियमानुसार, जर एखाद्या रेशनकार्ड होल्डरने मागील सहा महिन्यांपासून रेशन कार्डवर धान्य घेतलेलं नसेल, तर नियमांनुसार त्याला स्वस्तात मिळणाऱ्या धान्याची गरज नाही किंवा तो व्यक्ती स्वस्त दरातील धान्य घेण्यास पात्र नाही असा त्याचा अर्थ होतो. दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या या सुविधेचा अनेक जण लाभ घेत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ धान्य न घेतलेल्या व्यक्तीचं रेशन कार्ड रद्द केलं जाईल.
या कारणामुळे तुमचं रेशन कार्ड रद्द झालं असेल तर तुम्ही ते अॅक्टिव्ह करू शकता. यासाठी आपल्या राज्याच्या AePDS अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. इथे काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. एवढंच नाही, तर तुम्ही भारतभर कुठेही AePDS रेशन कार्ड पोर्टलवर रद्द झालेलं Ration Card Active करू शकता.
- सर्वात आधी राज्य किंवा सेंट्रल AePDS पोर्टलवर जा.
- आता Ration Card Correction पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
- Ration Card Correction पेज वर तुमचा रेशन नंबर शोधण्यासाठी फॉर्म भरावा लागेल.
- आता तुमच्या रेशन कार्डमध्ये काही चूका असल्यास त्या दुरुस्त करता येतील.
- त्यानंतर PDS अर्थात Public Distribution Systemकार्यालयात अर्ज सबमिट करावा लागेल.
- तुमचं रेशन कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी अर्ज स्वीकारल्यास त्यानंतर रद्द झालेलं रेशन कार्ड सक्रीय अर्थात अॅक्टिव्ह होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ration card