Home /News /money /

Ration Card: रेशनकार्डमधून नाव कापलं गेलंय? मग त्वरित करा हे साधं सोपं काम, नाहीतर...

Ration Card: रेशनकार्डमधून नाव कापलं गेलंय? मग त्वरित करा हे साधं सोपं काम, नाहीतर...

Ration Card: रेशनकार्डमधून नाव कापलं गेलं असेल तर त्वरित करा हे काम

Ration Card: रेशनकार्डमधून नाव कापलं गेलं असेल तर त्वरित करा हे काम

Ration Card Yojana: रेशनकार्डमधून लोकांचं नाव कापलं जातं किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव वजा केल्याचं दिसून येतं. त्यामुळे जर तुमचे नाव रेशनकार्डमधून वजा झालं असेल तर ते पुन्हा कसं जोडता येईल? (How To Activate Cancelled Ration Card) माहीत आहे का?

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 जुलै: केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, दोन्ही सरकारं लोकांसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवत असतात. या योजना अशा लोकांसाठी चालवल्या जातात, जे खरोखरच गरीब आहे आणि त्यांना खरोखरच मदतीची गरज आहे. त्यात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, विमा अशा अनेक योजनांचा समावेश आहे. अशीच एक योजना म्हणजे रेशन कार्ड योजना (Ration Card Yojana) होय. या योजनेअंतर्गत लोकांना शिधापत्रिका बनवून स्वस्त रेशन दिले जाते. कोरोनाच्या काळातही अनेक लोकांना शिधापत्रिकेच्या माध्यमातून मोफत रेशन दिले जात होतं. परंतु असं असलं तरी अनेक वेळा रेशनकार्डमधून लोकांचं नाव कापलं जातं किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव वजा केल्याचं दिसून येतं. त्यामुळे जर तुमचे नाव रेशनकार्डमधून वजा झालं असेल तर ते पुन्हा कसं जोडता येईल (How To Activate Cancelled Ration Card) ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या सोप्या पद्धतीने जोडता येतील नावं (Simple process to add name in Ration Card): स्टेप 1- जर काही कारणास्तव तुमचं नाव शिधापत्रिकेतून वजा झालं असेल तर तुम्ही ते जोडू शकता. यासाठी तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाइट https://nfsa.gov.in/Default.aspx वर जावं लागेल आणि येथे 'रेशन कार्ड' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. स्टेप 2- यानंतर तुम्हाला 'Ration Card Details On State Portals' वर क्लिक करावे लागेल. आता येथे तुमच्या राज्याचे नाव, जिल्हा, ब्लॉक आणि पंचायतीचे नाव निवडा. हेही वाचा: PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेची नवी यादी जाहीर, तुमचं नाव आहे की नाही? असं तपासा  स्टेप 3- त्यानंतर तुमचे रेशन दुकान, दुकानदाराचे नाव आणि शिधापत्रिकेचा प्रकार निवडा. त्यानंतर तुमच्यासमोर एक यादी येईल, ज्यामध्ये कार्डधारकांची नावे असतील. तुमचे नाव यादीतून काढले गेले आहे की नाही हे येथे तुम्हाला कळेल.  स्टेप 4- आता जर तुम्हाला दिसले की तुमचे नाव येथील यादीतून वगळले आहे, तर तुम्हाला ते जोडण्यासाठी तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागात जावे लागेल. हेही वाचा-  पर्सनल लोन इतर कर्जांपेक्षा महाग का असतं? काय आहेत कारणं?  स्टेप 5- मग येथे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि काही कागदपत्रे सबमिट करावी लागतील. त्यानंतर पडताळणी होईल आणि सुमारे 2 आठवड्यांनंतर तुमचे नाव शिधापत्रिकेत जोडले जाईल.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Ration card, Scheme

    पुढील बातम्या