जाहिरात
मराठी बातम्या / मनी / अबब! तब्बल 4693 मीटर उंचीवरचं जगातील एकमेव ATM; पैसे काढण्यासाठी लागते रांग

अबब! तब्बल 4693 मीटर उंचीवरचं जगातील एकमेव ATM; पैसे काढण्यासाठी लागते रांग

 अबब! तब्बल 4693 मीटर उंचीवरचं जगातील एकमेव ATM; पैसे काढण्यासाठी लागते रांग

अबब! तब्बल 4693 मीटर उंचीवरचं जगातील एकमेव ATM; पैसे काढण्यासाठी लागते रांग

चीन आणि पाकिस्तानदरम्यानच्या खंजराब खिंडीच्या सीमेवर असलेलं एटीएम जगातील सर्वांत उंच ठिकाणी असलेलं हे एटीएम आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 11 ऑक्टोबर: गेल्या काही वर्षांत बॅंकेशी निगडित सर्व कामं, आर्थिक व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. त्यामुळे आता अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज राहिलेली नाही. एटीएमच्या माध्यमातून तुम्ही कुठूनही आणि केव्हाही पैसे काढू शकता. त्याचप्रमाणे ऑनलाइन पेमेंट करू शकता, पैसे ट्रान्स्फर करू शकता. शहर किंवा ग्रामीण भागात गेल्यास तुम्हाला काही ठराविक अंतरावर बॅंकांची एटीएम केंद्रं दृष्टीस पडतात. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी एटीएम बसवलेली आहेत. यामुळे आर्थिक व्यवहार सुलभ झाले आहेत. अशाच एका खास एटीएमबाबत माहिती घेऊ या. हे एटीएम कोणत्याही शहरात किंवा गावात नाही, तर चक्क उंच बर्फाच्छादित पर्वतावर आहे. हे सर्वांत उंच ठिकाणी असलेलं जगातलं एकमेव एटीएम आहे. विशेष म्हणजे या एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांची भली मोठी रांग नेहमीच पाहायला मिळते. जगातील सर्वांत उंच ठिकाणी असलेलं हे एटीएम मशीन चीन आणि पाकिस्तानदरम्यानच्या खंजराब खिंडीच्या सीमेवर आहे. पाकिस्तानच्या या बर्फाच्छादित पर्वतीय भागात देश-विदेशातून मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. त्यामुळे हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जातं. या एटीएमचा वापर स्थानिक नागरिक, सीमा सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि पर्यटक करतात. हे मशीन पर्यटकांना विशेष आकर्षित करतं. `ढगातून पैसे पडत असल्याचा अनुभव येथे मिळतो,` असं एटीएममधून पैसे काढणाऱ्या अनेक पर्यटकांनी सांगितलं. या एटीएममध्ये जाणं आणि मशीनमधून पैसे काढणं हा एक सन्मान असल्याचं पर्यटकांना वाटतं. अनेक पर्यटक कायमस्वरूपी आठवण जपण्यासाठी येथून पैसे काढताना फोटो क्लिक करतात. हेही वाचा:  PM Swanidhi Yojana: व्यवसायासाठी हमीशिवाय मिळतं कर्ज, ‘ही’ आहे सरकारची खास योजना या एटीएमची देखभाल करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं, `हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे चार महिने लागले. एनबीपी बॅंकेची शाखा या ठिकाणापासून 87 किलोमीटर्स दूर आहे. या भागात खराब हवामान, खडतर पर्वतीय मार्ग आणि दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो. ही आव्हानं असतानाही बॅंकेचे कर्मचारी या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी नियमित येतात. सरासरी 15 दिवसांत या एटीएममधून सुमारे 40 ते 50 लाख रुपयांची रक्कम काढली जाते.`

    News18लोकमत
    News18लोकमत

    ‘नॅशनल बॅंक ऑफ पाकिस्तान’ अर्थात एनबीपीने या उंच ठिकाणी एटीएम बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2016 मध्ये या ठिकाणी एटीएम बसवण्यात आलं. वीजपुरवठा करण्यात अडचणीत असल्याने या एटीएमसाठी पवन ऊर्जेचा वापर केला जातो. 4693 मीटर उंचीवर उभारण्यात आलेल्या या एटीएमची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: ATM
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात