**मुंबई, 11 मे :**सध्याच्या काळात आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रत्येकाचं बँक अकाउंट असणं अत्यंत गरजेचं असतं. बँक अकाउंट आपले आर्थिक व्यवहार सुलभ करते. यासोबतच लोकांची जमा पुंजी देखील सुरक्षित ठेवते. यामुळे एक तरी बँक अकाउंट असणं गरजेचं असतं. पण असे अनेक लोक आहेत ज्यांचे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असतात. अशा वेळी एखादी व्यक्ती किती बँक अकाउंट उघडू शकते? याविषयी सरकारचा नेमका काय नियम आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
बँक अकाउंट
बँका अनेक प्रकारचे बँक अकाउंट प्रदान करत असतात. यामध्ये सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, सॅलरी अकाउंट आणि जॉइंट अकाउंट यांचा समावेश असतो. सेव्हिंग अकाउंट लोकांचे मुख्य खाते आहे. यामध्ये सहसा लोक बचतीसाठी खाते उघडतात आणि हे खाते बहुतेक लोकांचे प्राथमिक बँक खाते आहे. या खात्यावर व्याज देखील मिळते.
बँकिंग
तर करंट अकाउंट असे लोक उघडतात जे बिझनेस करतात आणि त्यांचे व्यवहार खूप जास्त असतात. यासोबतच ज्यांचा दर महिन्याला पगार येतो ते सॅलरी अकाउंट उघडतात. या खात्यांचे बरेच वेगवेगळे फायदे देखील आहेत आणि नियमित पगार आल्यावर त्यात मिनिमम बॅलेन्स ठेवणे आवश्यक नाही. हे एक तात्पुरते खाते देखील असू शकते जे तुम्ही तुमची नोकरी बदलताना बंद करण्याचा विचार करू शकता.
Doorstep Banking:आता बँक येईल तुमच्या घरी! असा घेता येईल सर्व्हिसचा लाभबँक अकाउंटची संख्या
तर जॉइंट अकाउंट हे पती-पत्नीमधील जॉइंट अकाउंट असू शकते. या खात्याचे अनेक फायदे देखील आहेत. दुसरीकडे, भारतात एखाद्या व्यक्तीची किती बँक खाती असू शकतात याची मर्यादा नाही. लोक त्यांच्या गरजेनुसार एकापेक्षा जास्त बँक अकाउंट उघडू शकतात.
सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम डेबिट-क्रेडिट कार्डमध्ये फरक काय? काय होतात फायदे?नेट बँकिंग
आर्थिक तज्ञांच्या मते, तीनपेक्षा जास्त सेव्हिंग अकाउंट उघडणं योग्य नाही. कारण नंतर हे अकाउंट मॅनेज करणं कठीण होऊ शकतं. या अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेन्स असणेही आवश्यक आहे. दुसरीकडे, जर काही काळ या बचत खात्यांमध्ये कोणतीही क्रिया होत नसेल तर बँक खाते देखील निष्क्रिय केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत एखाद्याच्या गरजेनुसार बँक खात्याची मर्यादा निश्चित केली पाहिजे. तसंच बँक खात्यांची संख्या किती असावी यासाठी सरकारचा काही वेगळा नियम नाही.