मराठी बातम्या /बातम्या /मनी /

डॉलरच्या तुलनेत रुपया का मार खातोय? जगभरात डॉलर मजबूत होण्याचं 'हे' आहे कारण

डॉलरच्या तुलनेत रुपया का मार खातोय? जगभरात डॉलर मजबूत होण्याचं 'हे' आहे कारण

या वर्षी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन सुमारे 7 टक्क्यांनी झाले आहे. डॉलरच्या तुलनेत केवळ रुपयाच नाही तर जगभरातील चलन कमकुवत झाले आहे. डॉलरच्या तुलनेत युरो 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. शेवटी, जगभरातील चलने डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत आहेत आणि डॉलर सतत मजबूत होत आहे याचे कारण काय आहे?

या वर्षी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन सुमारे 7 टक्क्यांनी झाले आहे. डॉलरच्या तुलनेत केवळ रुपयाच नाही तर जगभरातील चलन कमकुवत झाले आहे. डॉलरच्या तुलनेत युरो 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. शेवटी, जगभरातील चलने डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत आहेत आणि डॉलर सतत मजबूत होत आहे याचे कारण काय आहे?

या वर्षी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन सुमारे 7 टक्क्यांनी झाले आहे. डॉलरच्या तुलनेत केवळ रुपयाच नाही तर जगभरातील चलन कमकुवत झाले आहे. डॉलरच्या तुलनेत युरो 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. शेवटी, जगभरातील चलने डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत आहेत आणि डॉलर सतत मजबूत होत आहे याचे कारण काय आहे?

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 19 जुलै : जगाच्या अर्थकारणात (Economy) डॉलरला (Dollar) महत्त्वाचं स्थान आहे. गेल्या काही वर्षांपासून डॉलरच्या तुलनेत रुपया (Rupee) सातत्याने घसरत आहे. सध्या एका डॉलरची किंमत 80 रुपयांवर पोहोचली आहे. याचे आर्थिक परिणाम आपल्याला निश्चितच जाणवत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी का होतंय, तसंच अनेकदा डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य देशाच्या प्रतिष्ठेशी जोडलं जातं, हे योग्य आहे का असे प्रश्न अनेकांना पडतात. या गोष्टींमागे अनेक कारणं आहेत. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने रुपयाचं मूल्य मजबूत ठेवण्यासाठी दीर्घ काळ प्रयत्न केले; मात्र काही देशांनी आपल्या चलनाचं मूल्य कमी केलं. चलनाचं मूल्य कमी केल्यानं काही देशांची आर्थिक स्थिती सुधारली, तसंच जगातल्या चांगली अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत हे देश समाविष्ट झाले. भारताचा विचार करता, अलीकडच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य सातत्याने घसरत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया, तसंच अन्य देशांमधल्या चलनाचं मूल्य ठरवण्यासाठी काही गोष्टी विचारात घेतल्या जातात. कोणत्याही देशाच्या चलनाची किंमत ही अर्थव्यवस्था, मागणी आणि पुरवठा या मूलभूत तत्त्वांवर आधारित असते. परकीय चलन बाजारात अर्थात फॉरेन एक्स्चेंज मार्केटमध्ये (Foreign Exchange Market) ज्या चलनाला (Currency) जास्त मागणी असते, त्याची किंमतही जास्त असते. तसंच, ज्या चलनाची मागणी कमी असते, त्याची किंमत कमी असते. ही स्थिती पूर्णतः ऑटोमेटेड आहे. कोणत्याही देशाचं सरकार चलनाच्या दरावर थेट परिणाम करू शकत नाही.

चलनाचं मूल्य निश्चित करण्याचा आणखी एक मार्ग आहे. त्याला फिक्स्ड एक्स्चेंज रेट (Fixed Exchange Rate) असं म्हणतात. यात एका देशाचं सरकार कोणत्याही अन्य देशाच्या चलनाच्या तुलनेत आपल्या देशाच्या चलनाची किंमत निश्चित करतं; मात्र ही गोष्ट सर्वसामान्यपणे महागाई (Inflation) नियंत्रणासाठी आणि व्यापार वाढवण्यासाठी केली जाते. उदाहरणार्थ, नेपाळने भारतासोबत फिक्स्ड पेग एक्स्चेंज रेट (Fixed Pegged Exchange Rate) स्वीकारला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये एका भारतीय रुपयाची किंमत 1.6 नेपाळी रुपये अशी आहे. नेपाळशिवाय मध्य-पूर्वेतल्या काही देशांनीदेखील फिक्स्ड एक्स्चेंज रेट स्वीकारला आहे.

फॉरेन एक्स्चेंज ही एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असून, तिथं जगभरातली चलनं खरेदी आणि विक्री केली जातात. ही बाजारपेठ विकेंद्रित आहे. तेथे एका चलनाच्या बदल्यात निश्चित दराने दुसरं चलन घेतलं किंवा विकलं जातं. दोन्ही चलनांची खरेदी आणि विक्री ज्या दराने होते, त्याला विनिमय दर अर्थात एक्स्चेंज रेट म्हणतात. मागणी आणि पुरवठा या तत्त्वानुसार हा दर कमी-जास्त होतो.

RBI ची 'या' बँकेवर मोठी कारवाई; ग्राहकांना बँकेतून फक्त 15000 रुपये काढता येणार

डॉलर हे जगातलं सर्वांत मोठं चलन मानलं जातं. जगभरातला बहुतांश व्यापार (Business) डॉलर्समध्ये होतो. आपण परदेशातून मागवलेल्या वस्तूंसाठी डॉलर्स मोजावे लागतात आणि त्या विकल्यावर आपल्याला डॉलर्स मिळतात. सद्यस्थितीत आपण निर्यातीच्या तुलनेत आयात जास्त करत आहोत. त्यामुळे आपण दुसऱ्या देशांना जास्त डॉलर्स देत आहोत आणि आपल्याला कमी डॉलर्स मिळत आहेत. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर आपण अन्य देशांना वस्तूंची कमी प्रमाणात विक्री करत आहोत आणि त्यांच्याकडून जास्त वस्तू खरेदी करत आहोत.

जेव्हा चलनाचं मूल्य फ्लोटिंग एक्स्चेंज रेटवर कमी होतं, तेव्हा चलनाचं अवमूल्यन होतं. जेव्हा एखादा देश जाणूनबुजून त्याच्या देशाच्या चलनाचं मूल्य कमी करतो तेव्हादेखील चलनाचं अवमूल्यन होतं. उदाहरणार्थ, चीनने आपल्या चलनाचं अवमूल्यन केलं होतं. 2015 मध्ये पीपल्स बँक ऑफ चायनाने (PBOC) चिनी युआन रेनमिंबीचं (CNY) मूल्य कमी केलं होतं.

चलनाचं मूल्य कमी केल्यानं तुम्ही परदेशात अधिक वस्तू विकू शकता. यामुळे तुमची निर्यात वाढते. निर्यात वाढल्यानं परकीय चलन जास्त मिळतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक किलो साखरेचा भाव 40 रुपये असेल तर पूर्वी तो एका डॉलरमध्ये 75 रुपये होता. आता 80 रुपये झाला आहे. म्हणजेच तुम्ही आता एका डॉलरमध्ये दोन किलो साखर खरेदी करू शकता. म्हणजेच रुपयाच्या घसरणीमुळे परदेशी लोकांना भारतात बनवलेल्या वस्तू स्वस्त मिळतील. त्यामुळे निर्यात वाढेल आणि देशातल्या परकीय चलनाचा (Foreign Currency) साठाही वाढेल.

Home Loan चा EMI भरायला उशीर झाला तर नेमकं काय होतं?

दरम्यान, सध्या डॉलर मजबूत होण्यामागे काही कारणं आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) जगभरात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं. मागणी आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली. गुंतवणूकदारांनी भीतीपोटी जगभरातल्या बाजारांमधून पैसे काढून ते सुरक्षित ठिकाणी गुंतवले. अमेरिकी गुंतवणूकदारांनी भारत, युरोप, तसंच अन्य देशांमधला पैसा काढून घेतला. अमेरिका महागाई नियंत्रणासाठी व्याजदरात वाढ करत आहे. ही स्थिती ऐतिहासिक आहे. तीन महिन्यांत व्याज दर 1.5 टक्क्यांवरून 1.75 टक्क्यांपर्यंत वाढवले जातील, असं फेडरल रिझर्व्हने स्पष्ट केलं होतं. व्याजदर वाढल्याने गुंतवणूकदार आपला पैसा परत अमेरिकेत गुंतवू लागले आहेत. 2020 मधल्या आर्थिक मंदीदरम्यान अमेरिकेनं लोकांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर केले होते. हे पैसे अमेरिकी नागरिकांनी जगातल्या अन्य देशांमध्ये गुंतवले होते. आता हा पैसा पुन्हा अमेरिकेत जात आहे.

सध्या रुपयाच्या तुलनेत डॉलरचं मूल्य वाढत आहे. यामागे काही कारणं आहेत. केवळ रुपयाच्या तुलनेत नव्हे तर जगभरातल्या सर्व चलनांच्या तुलनेत डॉलरचं मूल्य वाढलं आहे. जगातल्या अव्वल अर्थव्यवस्था असलेल्या देशांशी तुलना केल्यास, डॉलरच्या तुलनेत इतर देशांच्या चलनाचं मूल्य जितकं कमी झालं तितकं रुपयाचं झालेलं नसल्याचं दिसून येतं. डॉलरच्या तुलनेत युरो 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. काही दिवसांपूर्वी एक युरोची (Euro) किंमत जवळपास एक डॉलर झाली होती. 2009 च्या सुमारास ही किंमत 1.5 डॉलर होती. 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत डॉलरच्या तुलनेत युरोचं मूल्य 11 टक्क्यांनी, येनचं 19 टक्क्यांनी आणि पौंडचं मूल्य 13 टक्क्यांनी घसरलं आहे. याचदरम्यान भारतीय रुपयाचं अवमूल्यन सुमारे सहा टक्क्यांनी झालं आहे. याचाच अर्थ युरो, पौंड (Pound) आणि येनच्या (Yen) तुलनेत भारतीय रुपयाची घसरण कमी झाली आहे.

First published:

Tags: Economy, Rupee