मुंबई, 8 डिसेंबर: आपलं स्वतःच्या मालकीचं एखादं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक खूप मेहनत घेतात. जर तुम्हाला तुमच्या हक्काचं घर (House Construction) बांधायचं असेल आणि तुम्ही नवीन वर्षात त्याचं नियोजन करत असाल, तर तुमच्यासाठी हा महागडा सौदा ठरू शकतो. कारण येत्या काही दिवसांत कंपन्या सिमेंटच्या किमतीत 10 ते 15 रुपयांनी वाढ करू शकतात, अशी शक्यता एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आपल्या स्वप्नातील घर तयार करण्यासाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे, कारण सध्या स्टील बारच्या किंमती देखील कमी आहेत.
सिमेंटचे भाव वाढणार आहेत का?
प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या हक्काचं घर हवं असतं. पण त्यासाठी आधी महागडी जमीन खरेदी करावी लागते आणि मग त्यावर घर बांधण्यासाठीही खर्च करावा लागतो. हा खर्च तसा मोठा असतो. त्यामुळंच लोकांना हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावा लागतो. परंतु एवढं करूनही बऱ्याचदा लोकांचा प्लॅन फसतो. घर बांधण्यासाठी लागणार्या खर्चाचा मोठा भाग हा स्टील बार आणि सिमेंटवर खर्च होतो. या वस्तूंचे दर कमी झाल्यास बांधकामावरील खर्चही कमी होतो. या क्षणी, जर आपण याबद्दल बोललो तर, स्टील बारच्या किंमतीत घसरण दिसून आली आहे. सध्याचा स्टीलचा दर ऑक्टोबरच्या तुलनेत खूपच कमी आहे. असं असलं तरी लवकरच सिमेंटच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Train Ticket Tips: ट्रेन तिकीट असं करा कॅन्सल, बुलेटच्या स्पीडनं मिळेल रिफंड
10-15 रुपयांपर्यंत होऊ शकते वाढ-
बिझनेस स्टँडर्डवर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार या वर्षी सिमेंटच्या किमतीत वाढ झाली आहे. MK ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट 2022 मध्ये देशभरात सिमेंटच्या किमतीत प्रति बॅग 16 रुपयांनी वाढ झाली आहे, तर गेल्या नोव्हेंबरमध्ये प्रति बॅग सुमारे 6-7 रुपयांची वाढ झाली आहे. या अहवालात शक्यता व्यक्त करताना सिमेंट कंपन्या या महिन्यात देशभरात प्रति बॅग 10 ते 15 रुपयांनी भाव वाढवण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पुढच्या वर्षाची वाट का पाहायची?
स्टील बारच्या किमतींमध्ये दररोज बदल दिसून येतात. अशा स्थितीत आज ज्या दरानं स्टील-बार मिळत आहे, काही दिवसांनी तेवढ्याच दरात उपलब्ध होतील की नाही हे सांगता येणार नाही. ज्याप्रमाणे सिमेंटच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे स्टीलच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. असं झालं तर तुमचा बांधकाम खर्च वाढेल. सिमेंट आणि स्टील किमतीतील चढ-उताराचा थेट परिणाम रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रावर दिसून येत आहे. जेव्हा या वस्तूंची किंमत वाढते, तेव्हा बांधकामाची किंमतही वाढते आणि जेव्हा त्या स्वस्त होतात, तेव्हा खर्चात लक्षणीय घट होते.
येथे नवीनतम दर तपासा-
भारतातील प्रमुख शहरांमध्ये स्टीलचे दर वेगवेगळे आहेत आणि त्यातील बदलही वेगळ्या पद्धतीने दिसून येतो. Ironmart (ayronmart.com) या वेबसाइटवर बारच्या किमतींमध्ये दररोज होणाऱ्या बदलांचा तपशील मिळू शकतो. याद्वारे तुम्ही तुमच्या शहरातील स्टील बारची किंमत सहज शोधू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Inflation