मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सोन्याचे भाव रेकॉर्ड स्तरावर! जाणून घ्या काय आहेत कारणं आणि कधी कमी होणार किंमती

सोन्याचे भाव रेकॉर्ड स्तरावर! जाणून घ्या काय आहेत कारणं आणि कधी कमी होणार किंमती

यावर्षी सोन्याच्या किंमतीमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळते आहे. आर्थिक धोरण आणि अर्थव्यवस्थेमधील अनिश्चितता यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.

यावर्षी सोन्याच्या किंमतीमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळते आहे. आर्थिक धोरण आणि अर्थव्यवस्थेमधील अनिश्चितता यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.

यावर्षी सोन्याच्या किंमतीमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळते आहे. आर्थिक धोरण आणि अर्थव्यवस्थेमधील अनिश्चितता यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 21 जुलै : सोनेबाजारात यावर्षी सोन्याचे भाव 2011 या वर्षातील रेकॉर्ड वाढीपेक्षाही पुढे जाण्याची शक्यता आहे. यावर्षी सोन्यामध्ये होणाऱ्या रेकॉर्ड वाढीसाठी विविध फॅक्टर निगडीत आहेत. सिटीग्रृप इंक (Citigroup Inc.)च्या मते सोन्यामध्ये ही वाढ आर्थिक धोरण, रियल यील्ड्समध्ये कमी, एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये रेकॉर्ड इनफ्लो आणि अॅसेट एलॉकेशनमध्ये झालेली वाढ यामुळे पाहायला मिळते आहे. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की येणाऱ्या काळात सोन्याचे भाव आणखी वेगाने वाढतील आणि आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर सोने पोहोचेल. असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे की, पुढील 3 ते 5 महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 2 हजार डॉलर प्रति औन्स पेक्षा वर जातील.

चांदीच्या देखील किंमती वाढणार

तज्ज्ञांच्या मते सर्व G-10 देशात (G-10 Nations) आणि उदयोन्मुख बाजारात सोन्याच्या दरात छोटीशी जरी वाढ झाली तरी ते नवे रेकॉर्ड रचत आहे. त्यांच्या मते आणखी काही वेळातच सोने नवा रेकॉर्डही रचेल. ब्लूमबर्गने त्यांच्या एका अहवालात अनालिस्ट्सचा हवाला देत असे सांगितले आहे की, सोन्याच्या या मागणीमुळे चांदीच्या किंमतीमध्ये देखील वाढ पाहायला मिळेल. नुकत्याच काही दिवसांपूर्वी चांदीच्या किंमती न्यूयॉर्कमध्ये 3 वर्षातील सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या होत्या.

यावर्षी 19 टक्के महाग झालं सोनं

सिटीग्रृपचे असे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण आणि अर्थव्यवस्थेवर याचा दीर्घकाळासाठी होणारा परिणाम लक्षात घेता, सोने सर्वोच्च स्तरावर पोहोचेल. 2011 नंतर यावर्षी स्पॉट गोल्डमध्ये 19 टक्के वाढ झाली आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात गुंतवणूकदारांनी हा सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय पसंत केल्यामुळे ही तेजी आली आहे. तथापि, काही अनिश्चित चलनविषयक धोरणे आणि अर्थव्यवस्थेतील मंदी यामुळे काही प्रमाणात याला समर्थन मिळत आहे.

(हे वाचा-बँकांचंही होणार खासगीकरण? देशात केवळ या 5 सरकारी बँका राहतील शिल्लक)

सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 31 रुपयांनी कमी होऊन 49,916 रुपये प्रति तोळ्यावर गेला होता. तर चांदी देखील 51 रुपयांनी घसरली होती. त्यानंतर चांदीचे दर 53,948 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे नवे दर 19.35 डॉलर प्रति आउन्स तर सोन्याचे भाव 1,809 डॉलर प्रति आउन्स आहेत.

First published:

Tags: Gold