मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Shark Tank India: हजारो कोटींचे मालक असणाऱ्या 'शार्क्स'ची शैक्षणिक पात्रता काय?

Shark Tank India: हजारो कोटींचे मालक असणाऱ्या 'शार्क्स'ची शैक्षणिक पात्रता काय?

शार्क टॅंकचे (Shark Tank India) हे जज आयुष्यात एवढे यशस्वी कसे झाले. यामागे नक्कीच त्यांची शिक्षणाची पार्श्वभूमी असणार. त्यामुळे जाणून घेऊया त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे.

शार्क टॅंकचे (Shark Tank India) हे जज आयुष्यात एवढे यशस्वी कसे झाले. यामागे नक्कीच त्यांची शिक्षणाची पार्श्वभूमी असणार. त्यामुळे जाणून घेऊया त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे.

शार्क टॅंकचे (Shark Tank India) हे जज आयुष्यात एवढे यशस्वी कसे झाले. यामागे नक्कीच त्यांची शिक्षणाची पार्श्वभूमी असणार. त्यामुळे जाणून घेऊया त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 4 फेब्रुवारी: शार्क टँक इंडिया या नवीन रिअॅलिटी शोने नवीन व्यावसायिकाच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याच्या संकल्पनेने संपूर्ण देशाला प्रभावित केले आहे. यामुळे अनेक नवीन व्यावसायिकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे दरवाजे खुले झाले आहेत. हा कार्यक्रम नवीन विचार आणि नवीन प्रोडक्ट्स समोर आणण्यासाठी एक नवीन व्यासपीठ देत आहे.

नवीन व्यावसायिकांनी व्यवसायाची कल्पना जजेस समोर ठेवली. शोमध्ये अशनीर ग्रोव्हर, अमन गुप्ता, नमिता थापर, पियुष बन्सल, विनिता सिंग, गझल अलघ आणि अनुपम मित्तल यांचा समावेश असलेली 7 सदस्यीय ज्युरी टीम आहे, ज्यांना गुंतवणूक मिळवण्यासाठी नवीन व्यावसायिकांना प्रभावित करावे लागेल. मात्र शार्क टॅंकचे हे जज आयुष्यात एवढे यशस्वी कसे झाले. यामागे नक्कीच त्यांची शिक्षणाची पार्श्वभूमी असणार. त्यामुळे जाणून घेऊया त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे.

1. अशनीर ग्रोव्हर (Ashneer Groover)

BharatPe चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि सह-संस्थापक (Co-Founder) अश्नीर ग्रोव्हर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली मधून पदवीधर आहेत. तसेच IIM अहमदाबादचे माजी विद्यार्थी आहेत. अशनीर ग्रोव्हर त्यांच्या पदवीच्या दिवसांमध्ये INSA Lyon साठी एक्सचेंज स्टुडंट म्हणून निवडले गेले आणि 2002-2003 दरम्यान INSA-Lyon विद्यापीठ फ्रान्समध्ये कार्यक्रमासाठी गेले.

2. नमिता थापर

पुण्यात जन्मलेल्या नमिता थापर, एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या (Emcure Pharmaceuticals) कार्यकारी संचालक असून त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील एका शाळेत झाले. नंतर त्यांनी ICAI मधून चार्टर्ड अकाउंटंटची पदवी घेतली. त्यानंतर नमिता यांनी MBA केले आणि ड्यूक युनिव्हर्सिटीच्या फुका स्कूल ऑफ बिझनेसमधून पदवी मिळवली.

3 अमन गुप्ता

BoAt चे सह-संस्थापक आणि CMO अमन गुप्ता, ज्यांनी दिल्ली पब्लिक स्कूल आरके पुरम येथे शिक्षण घेतले, त्यांनी नंतर सीए करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) मध्ये शिक्षण घेतले. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी फायनान्स आणि स्ट्रॅटेजीमध्ये एमबीए केले आहे. त्याचे दुसरे MBA केलॉग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंट यूएसए मधून आहे. त्यांनी येथे व्यवस्थापन आणि मार्केटिंगमध्ये MBA केले आहे.

4. विनिता सिंग

शुगर कॉस्मेटिक्सच्या (Sugar Cosmetics) संस्थापक आणि सीईओ विनिता सिंग यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

5. गझल अलग

मम्माअर्थ (MamaEarth) या कॉस्मेटिक ब्रँडचे सह-संस्थापक आणि प्रमुख गझल अलघ यांनी पंजाब विद्यापीठातून बीसीए (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन) केले आहे.

6. अनुपम मित्तल

पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ अनुपम मित्तल हे बोस्टन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्यांनी ऑपरेशन्स आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये एमबीएची पदवी देखील घेतली आहे.

7. पियुष बन्सल

लेन्सकार्टचे (LensKart) संस्थापक आणि सीईओ पीयूष बन्सल यांनी मॅक्गिल युनिव्हर्सिटी, मॉन्ट्रियल, कॅनडातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्याच्याकडे आयआयएम पदव्युत्तर पदवी देखील आहे.

First published:

Tags: Business, Finance, Investment, Money, Reality show, Sugar, Tv serial