जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 1 जूनपासून होणार 3 मोठे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

1 जूनपासून होणार 3 मोठे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

1 जूनपासून बदलणार नियम, बातमी तुमच्या कामाची

1 जूनपासून बदलणार नियम, बातमी तुमच्या कामाची

मे महिना आता संपायला आहे, तीनच दिवसांमध्ये जून महिन्याला सुरूवात होणार आहे. जून महिन्यामध्ये तुमच्या रोजच्या जीवनमानामध्ये फरक होणार आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 जून : मे महिना आता संपायला आहे, तीनच दिवसांमध्ये जून महिन्याला सुरूवात होणार आहे. जून महिन्यामध्ये तुमच्या रोजच्या जीवनमानामध्ये फरक होणार आहे, ज्याचा परिणाम थेट तुमच्या बजेटवर होणार आहे. सरकारच्या निर्णयांमुळे जून महिन्यापासून सामान्यांच्या खिशावर परिणाम होईल. गॅसचे भाव बदलणार सरकारकडून प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीला एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीचे भाव निश्चित केले जातात. सरकारी गॅस कंपन्यांकडून एप्रिल ते मे दरम्यान प्रत्येक महिन्यात 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली. पण 14 किलो गॅस सिलेंडरच्या भावामध्ये कोणताही बदल झाला नाही, त्यामुळे जून महिन्यात सिलेंडरच्या किंमीतमध्ये बदल होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इलेक्ट्रिक टू व्हीलर महाग 1 जून पासून देशभरात इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किंमती वाढणार आहे. 21 मे च्या नोटिफिकेशननुसार अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक टू व्हीलरवरची सबसिडी कमी केली आहे. आधी ही सबसिडी 15 हजार रुपये प्रती kWh होती ती आता 10 हजार रुपये kWh एवढी करण्यात येणार आहे. या कारणामुळे जून महिन्यापासून इलेक्ट्रिक टू व्हीलर विकत घेणं 25-30 हजार रुपयांनी महागणार आहे. बँका पैसे परत करणार आरबीआयने बँकेत पडलेल्या आणि दावा करण्यात न आलेल्या डिपॉझिट्सच्या वारसांना शोधण्याचं अभियान राबवणार आहे. आरबीआयने बँकांसाटी 100 Days 100 Pays या अभियानाची घोषणा केली आहे. यामुळे देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात 100 दिवसांमध्ये बँकेच्या सर्वाधिक 100 अनक्लेम डिपॉझिट्सची माहिती मिळू शकेल. 1 जूनपासून हे अभियान सुरू होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: RBI
  • First Published :
जाहिरात
जाहिरात